Amazon Great Freedom Festival Sale : अलीकडेच Amazon प्राईम डे सेल संपला आहे.  प्रसिद्ध ई-कॉमर्स Amazon प्लॅटफॉर्म आता परत एक नवीन सेल ग्राहकांकरता सुरू करणार आहे. यावेळी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी, Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल ग्राहकांकरता लवकरच सुरू होणार आहे. Amazon चा फ्रीडम सेल 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत चालेल. या काळात विविध उत्पादने खरेदी केल्यावर मोठी सवलत ग्राहकांना मिळणार आहे. तुम्ही प्राईमचे सदस्य 24 तासाच्या अगोदर या डीलचा लाभ घेऊ शकतील. जर तुम्ही नवीन iPhone 14 खरेदी करण्याचा प्लॅन बनवला असेल तर हा फोन कमी किमतीत मिळेल.


पाच दिवसांच्या सेलमध्ये Amazon अनेक डील आणि डिस्काउंट ऑफर देणार आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससह इतर अनेक उत्पादनांवर या डीलचा लाभ मिळेल. याशिवाय SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटची सुविधा मिळेल . कंपनीने आगामी सेलच्या काही डीलचे टीझर देखील शेअर केले आहेत.


 iPhone 14 ऑफर


Amazon ने दिलेल्या माहितीप्रमाणाे, ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये Apple iPhone 14 वर भन्नाट सूट मिळू शकते. याशिवाय OnePlus Nord 3, Samsung Galaxy M14 5G, Realme Narzo 60 Pro सारखे स्मार्टफोनही स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. Amazon ने दावा केला आहे की, या सेल दरम्यान आगामी Redmi 12 5G विक्रीसाठी उपलब्ध असेल.


Amazon Great Freedom Festival Sale ऑफर


स्मार्टफोन व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना इतर उत्पादनांवर भन्नाट ऑफरचा लाभ देखील मिळेल. Amazon Freedom Festival Sale मध्ये उपलब्ध असलेल्या काही ऑफरवि्षयी जाणून घ्या.



  • अॅमेझॉन लॅपटॉप आणि अॅक्सेसरीजवरही भरघोस सूट देणार आहे.

  • HP 15s लॅपटॉप 38,990 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल.

  • Dell Vostro 3420 3420 कमी किंमतीत होईल उपलब्ध. हा लॅपटॉप तुम्ही 48,990 रुपयांना खरेदी करू शकता.


याशिवाय, बजेट स्मार्टवॉच, TWS, Android टॅब्लेट आणि पॉवर बँक सारखी उत्पादने देखील Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल  दरम्यान सवलतीच्या दरात खरेदीसाठी उपलब्ध असतील. सोबतच जर तुम्हाला लॅपटॉप किंवा वायरलेस इयरबड्स खरेदी करायचे असतील तर मात्र काही दिवस प्रतीक्षा करा. त्यानंतर तुम्ही या सेलमध्ये लॅपटॉप, इयरफोन, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर तुम्हाला 75 टक्के सूट मिळू शकते. Amazon नुसार, तुम्हाला Apple आणि इतर ब्रँडेड टॅब्लेटवर देखील 50 टक्के सूट मिळू शकते.


 


इतर महत्वाच्या बातम्या


रिलायन्स जियोचा धमाका! केवळ 16 हजारात मिळणार JioBook 4G, मिनी लॅपटॉपची ही आहेत वैशिष्ट्ये आणि सर्वकाही माहिती