Apple iPhone 15 Pro Max : आयफोन प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने 12 सप्टेंबर रोजी त्याचे नवीन गॅजेट्स (iPhone 15) बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. आयफोन 15, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 15 अल्ट्रा बाजारात येणार आहे. सोबतच ॲपल वॉच 9 आणि आयपॅडचे नवे वर्जन बाजारात दाखल होतील. 


iPhone 15 मध्ये काय नवीन वैशिष्टे असतील आणि त्याची नेमकी किंमत किती असेल हे अद्याप समोर आलं नसलं तरीही त्याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. 


iPhone 15 ची संभाव्य वैशिष्ट्ये अशी असतील


iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.


कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते.


आयफोन लॉन्च व्हायला आता फक्त 12 दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक वेळी प्रमाणे या सीरिजमध्ये चार मॉडेल्स (iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, आणि iPhone 15 Pro Max) असतील. नवीन iPhones मध्ये USB-C पोर्ट असण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे ते iPhones साठी पहिले असेल.


iPhone 15 ची संभाव्य किंमत


मिळालेल्या माहितीनुसार, भारतात iPhone 15 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असण्याची शक्यता आहे. ही सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत असू शकते. 


या संबंधित बातम्या वाचा: