एक्स्प्लोर

How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!

How To Check TV Remote Problem: टीव्ही पाहताना कधी-कधी अचानक रिमोट काम करणे बंद होते. आपण वारंवार बटणे दाबतो, रिमोट हातावर आपटतो; मात्र टीव्हीचा चॅनल बदलत नाही.

How To Check TV Remote Problem: टीव्ही पाहताना कधी-कधी अचानक रिमोट (TV Remote Problem) काम करणे बंद होते. आपण वारंवार बटणं दाबतो, रिमोट हातावर आपटतो; मात्र टीव्हीचा चॅनल बदलत नाही. अशावेळी रिमोट खराब झाला आहे की त्याची बॅटरी संपली आहे, असा प्रश्न पडतो. अशा वेळी लगेच नवीन रिमोट घेण्याची किंवा तो दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिककडे जाण्याची गरज नाही. तुमच्या खिशात असलेला स्मार्टफोनच या समस्येचे उत्तर देऊ शकतो. मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अवघ्या 10 सेकंदात रिमोट व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे तपासू शकता.

टीव्हीचा रिमोट कसा काम करतो? (TV Remote Problem Marathi News)

बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश टीव्ही, एसी आणि सेट-टॉप बॉक्सचे रिमोट इन्फ्रारेड तंत्रज्ञानावर काम करतात. रिमोटवरील कोणतेही बटण दाबल्यानंतर त्याच्या पुढील बाजूस असलेल्या छोट्या एलईडीमधून इन्फ्रारेड प्रकाशकिरण बाहेर पडतात. हे सिग्नल टीव्ही किंवा इतर उपकरणाच्या सेन्सरपर्यंत पोहोचतात आणि त्यानुसार कमांड दिली जाते. हा इन्फ्रारेड प्रकाश मानवी डोळ्यांना दिसत नाही. मात्र, स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याला हा प्रकाश दिसू शकतो. याच तंत्राचा वापर करून आपण रिमोटची प्राथमिक तपासणी करू शकतो.

मोबाइल कॅमेऱ्याच्या मदतीने रिमोट कसा तपासायचा? (How To Check TV Remote Problem)

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील कॅमेरा अॅप सुरू करा. त्यानंतर रिमोटच्या पुढील बाजूस असलेला इन्फ्रारेड एलईडी कॅमेऱ्यासमोर ठेवा. आता रिमोटवरील कोणतेही बटण दाबून ठेवा आणि त्याच वेळी मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहा. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर रिमोटच्या एलईडीमधून चमकणारा प्रकाश दिसला, तर रिमोटमधून इन्फ्रारेड सिग्नल जात असल्याचे समजते. अशावेळी रिमोटची बॅटरी आणि सर्किट प्राथमिकदृष्ट्या काम करत असण्याची शक्यता आहे. समस्या टीव्हीच्या सेन्सरमध्ये किंवा इतर ठिकाणी असू शकते. प्रकाश खूपच कमी दिसत असेल, तर रिमोटच्या बॅटरीची क्षमता कमी झालेली असण्याची शक्यता आहे. अशावेळी नवीन बॅटरी लावून पाहा. बटण दाबल्यानंतर कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर अजिबात प्रकाश दिसत नसेल, तर रिमोटची बॅटरी पूर्णपणे संपलेली असू शकते किंवा रिमोटच्या सर्किटमध्ये बिघाड झालेला असू शकतो.

रिमोटमधील बॅटरीचा भागही तपासा- (How To Check TV Remote Problem)

काही वेळा बॅटरी संपलेली नसतानाही रिमोट काम करत नाही. रिमोटमध्ये ज्या ठिकाणी बॅटरी बसवली जाते, त्या भागातील धातूच्या स्प्रिंगवर धूळ अथवा गंज साचल्यामुळे वीजप्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे बॅटरी बदलण्यापूर्वी हा भाग तपासा. रिमोट बंद ठेवून तो भाग कोरड्या कापडाने हलक्या हाताने स्वच्छ करून पाहा. त्यानंतर बॅटरी पुन्हा बसवून रिमोट तपासा. थोडक्यात, रिमोट लगेच खराब झाला असे गृहीत धरून नवीन रिमोट घेण्यापूर्वी मोबाइलच्या कॅमेऱ्याच्या मदतीने त्याची प्राथमिक तपासणी नक्की करून पाहा.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Embed widget