Mobiles under 10000 : चिंता सोडा! 10 हजारांच्या बजेटमध्ये येतात 'हे' बजेट फ्रेंडली स्मार्टफोन; रॅम आणि बॅटरीही मजबूत
Mobiles under 10000 : या यादीमध्ये लावा, मोटोरोला, पोको आणि आयटेल सारख्या कंपन्यांचे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
Mobiles under 10000 : आपल्यापैकी अनेकांना नवीन मोबाईल (Mobile) विकत घेताना कमी किंमतीचा पण जास्त फीचर्स असलेला स्मार्टफोन हवा असतो. पण, अनेकदा इच्छा असूनही पैशांअभावी चांगले मोबाईल विकत घेता येत नाही. अशा वेळी जास्त रॅम आणि मजबूत बॅटरी असलेला मोबाईल तेही कमी किंमतीत असेल तर? या ठिकाणी आम्ही तुम्हाला असेच काही 10,000 रुपयांच्या किमतीच्या श्रेणीत उपलब्ध असलेले बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सांगणार आहोत. जे 12GB पर्यंत रॅम आणि 7000mAh पर्यंत बॅटरी देतात. याशिवाय, यापैकी काही मॉडेल्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटीचा फायदा देखील मिळेल.
या यादीमध्ये लावा, मोटोरोला, पोको आणि आयटेल सारख्या कंपन्यांचे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन उपलब्ध आहेत जे कमी बजेट असलेल्यांसाठी डिझाईन केले गेले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत किती आहे आणि या स्मार्टफोनमध्ये कोणते विशेष फीचर्स उपलब्ध आहेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Lava Blaze 5G ची भारतात किंमत
या 5G स्मार्टफोनचा 4 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 9,299 रुपयांना विकला जात आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 7 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट असेल आणि ब्लॉटवेअर शिवाय स्वच्छ Android अनुभव असेल. याशिवाय, 50 मेगापिक्सेल एआय ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5G सपोर्टसह 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी उपलब्ध आहे.
itel P40 Plus भारतात किंमत
या बजेट स्मार्टफोनचा 4 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 7299 रुपयांना विकला जात आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाईसमध्ये 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. याशिवाय फोनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी 8 GB व्हर्च्युअल रॅम आणि 7000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
itel P55 5G ची भारतात किंमत
या 5G मोबाईल फोनचा 6 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 10,499 रुपयांना विकला जात आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटवर 2 वर्षांची वॉरंटी उपलब्ध असेल. एवढेच नाही तर फोनमधील 50 मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असलेली 5000 mAh बॅटरी फोनमध्ये जीवंतपणा आणते.
Motorola G32 ची भारतात किंमत
या बजेट स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9999 रुपयांना विकला जात आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 5000 mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
Poco C65 ची भारतात किंमत
या पोको स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9499 रुपयांना विकला जात आहे. 5000 mAh च्या शक्तिशाली बॅटरीशिवाय, या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल AI ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपचा फायदा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :