Safer Internet Day 2023 : Safer Internet दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Safer Internet Day 2023 : दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो.
Safer Internet Day 2023 : सर्वप्रथम 2004 साली युरोपमध्ये 'सेफर इंटरनेट डे' ( Safer Internet Day) साजरा करण्यात आला. ऑनलाईन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. हा दिवस जगभर 'सेफर इंटरनेट डे' म्हणजे सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. 2004 साली EU सेफबॉर्डरच्या प्रकल्पाने याची सुरुवात झाली. नंतर 2005 मध्ये ते Insafe नेटवर्कने ताब्यात घेतले. हा दिवस (इंटरनेट सेफर डे) आज जगातील 170 देशांमध्ये साजरा केला जातो. कारण आजच्या तारखेत आपण निम्म्याहून अधिक काम ऑनलाईन करत आहोत. आज आपली बहुतांश आर्थिक कामे ऑनलाईन होत आहेत. अशा परिस्थितीत ते सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
ऑनलाईन वर्तन
इंटरनेटच्या माध्यमातून जग जसं आपल्या मुठीत आलं आहे तसा त्याचा धोकाही वाढला आहे. त्याचा वापर करताना सुरक्षिततेच्या खबरदारी घेण्यात आल्या नाहीत तर आपल्याला आर्थिक आणि मानसिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपण सुरक्षितता बाळगायला हवी. खास तरुण वयातील मुलांनी याची काळजी घेतली पाहिजेत. पालकांनीही आपली मुले इंटरनेटवर काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत याची खातरजमा करणे आवश्यक आहे.
कोणतेही अॅप वापरताना किंवा पेजवर जाताना आपण अनावश्यक परवानग्या देतो. त्याचा फायदा घेऊन संबंधित कंपन्या आपला डेटा गोळा करतात, तसेच त्याचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केला जातो. केवळ एका क्लिकवर आपल्या आयुष्यभराची कमाई उडू शकते. असे अनेक धोके इंटरनेट वापरताना असतात.
पासवर्ड स्ट्राँग असणे आवश्यक
आपले इंटरनेट सुरक्षित ठेवायचे असेल तर आपला पासवर्ड हा स्ट्राँग असला पाहिजे. पासवर्ड आपले नाव, किंवा जन्मतारीख नसावी. त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरचा वापर करायला हवा. आपला पासवर्ड हा ठराविक काळानंतर सातत्याने बदलला पाहिजे.
सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने आज जगभर इंटरनेटच्या सुरक्षित वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे, त्या बद्दल जागरुकता करण्यात येत आहे. इंटरनेट वापरताना काही निर्देशांचे पालन करण्यासाठी अथवा त्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला काही सेकंदाचा वेळ लागतो, पण त्यामुळे केवळ आपले इंटरनेटच नव्हे तर भविष्यही सुरक्षित होतं हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या :