एक्स्प्लोर

Ram Temple Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं live telecast कसे आणि कुठे पाहता येईल?

Ram Temple Ayodhya : देशभरातील प्रत्येक राम भक्तासाठी  22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होणार आहे.

Ram Temple Ayodhya : सध्या सगळीकडे राम मंदिराची चर्चा आहे. राम (Ram Temple Ayodhya)मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळ्या आपल्या डोळ्यात साठवूण घेण्यासाठी अनेक राम भक्त प्रयत्नशील दिसत आहेत. अनेकांना राममंहिराच्या या दिमाखदार सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र देशभरातील प्रत्येक राम भक्तासाठी  22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. या सोहळ्यात लोकांनी व्हर्च्युअली सहभागी व्हावे, असे आवाहन राम मंदिर ट्रस्टने केले आहे. देशभरातील गावे आणि शहरांमधील सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिरांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान मुख्य विधी करतील.

कुठे पाहता येणार दिमाखदार सोहळा?

अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातून सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अयोध्या धाममधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनेलवर या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दूरदर्शन इतर वृत्तसंस्थांसोबतही फीड शेअर करणार आहे. इतर ब्रॉडकास्टर्ससाठी दूरदर्शन युट्युब लिंक शेअर करणार आहे.

40 कॅमेरे बसवण्यात येणार

अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराचा अभिषेक सोहळा थेट दाखवण्यासाठी दूरदर्शन सुमारे 40 कॅमेरे बसवत आहे. नवनिर्मित राम मंदिर परिसराव्यतिरिक्त शरयू घाटाजवळील राम की पायरी, कुबेर टिळ्यावरील जटायु पुतळा अशा ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही सर्व छायाचित्रे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर दाखवली जाणार आहेत.

मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण

प्रभू राममंदिराचा हा पवित्र सोहळा संपूर्ण देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवण्याची तयारी दूरदर्शनने केली आहे. जगभरातील अनेक भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय भारतभरातील हजारो मंदिरे आणि चौक्यांवरही हा कार्यक्रम प्रसारित करण्याची तयारी करण्यात येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या खास प्रसंगी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक निमंत्रित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune To Ayodhya Train : पुणेकरांनो चलो अयोध्या! पुणे ते अयोध्या 15 विशेष ट्रेन, कधीपासून करता येणार प्रवास?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget