(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oppo चे तीन जबरदस्त फोन लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन
Oppo Reno 10 Series: चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo लवकरच आपली Reno 10 सीरीज सादर करणार आहे.
Oppo Reno 10 Series: चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo लवकरच आपली Reno 10 सीरीज सादर करणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी 3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये पहिला Oppo Reno 10, दुसरा Oppo Reno 10 Pro आणि तिसरा Oppo Reno 10 Pro Plus आहे. ही सीरीज चीनमध्ये लॉन्च केली जाईल, जी नंतर इतर बाजारपेठांमध्ये येईल. भारतात ही सीरीज जून किंवा जुलैपर्यंत दाखल होऊ शकते. यामध्ये कंपनी जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स देऊ शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
OPPO Reno 10 सीरीज स्पेसिफिकेशन
एका टिपस्टरने ट्विटरच्या माध्यमातून OPPO Reno 10 सीरीजचे फीचर्स उघड केले आहेत. Oppo Reno 10 सीरीजच्या बेस व्हेरिएंटमध्ये कंपनी तुम्हाला 6.7-इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले देऊ शकते. याशिवाय तुम्हाला 2X पोर्ट्रेट लेन्स आणि समोर 32-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. तर Reno 10 Pro+ 5G मध्ये तुम्हाला 1220*2712 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.5K डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX890 कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळू शकतो. याशिवाय 80 किंवा 100 वॅट्सच्या फास्ट चार्जिंगसह टॉप एंड व्हेरियंटमध्ये 4600 mAh बॅटरी आढळू शकते.
Oppo Reno 10 Series: किती असेल किंमत?
Oppo Reno 10 सीरीजची किंमत भारतात 35 ते 40,000 रुपये असू शकते. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. फक्त इंटरनेटवरील काही रिपोर्ट्समध्ये, OPPO Reno 10 या किंमत रेंजमध्ये लॉन्च केला जाईल, असे सांगितले जात आहे.
Nokia X30 5G भारतात लॉन्च
Nokia X30 5G भारतात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. हा फोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाईट कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची किंमत 48,999 रुपये आहे. फोनवर प्री-लॉन्च ऑफर देखील उपलब्ध आहे. एचएमडी ग्लोबल फोनवर 6,500 रुपये किमतीचे फायदे देत आहे, ज्यामध्ये डिव्हाइस प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर 1,000 रुपये सूट आणि 2,799 रुपयांचे नोकिया कम्फर्ट इयरबड्स आणि 2,999 रुपयांचे 33W चार्जर यांचा समावेश आहे. 21 फेब्रुवारीपासून डिव्हाइसची शिपिंग सुरू होईल.
Tecno Pop 7 Pro लॉन्च
Techno ने आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pop 7 Pro भारतात पॉप सीरीज अंतर्गत 2 स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या 2GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 6,799 रुपये आहे तर 3GB + 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे. 22 फेब्रुवारीनंतर तुम्ही हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकाल. ज्यांना स्वस्तात Android फोनचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन उत्तर पर्याय आहे.