OnePlus 12R Smartphone : OnePlus 12R खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनी पूर्ण रिफंड करणार; नेमकी भानगड काय?
OnePlus 12R Smartphone : OnePlus ने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला होता. OnePlus 12R हा 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो आणि दुसरा व्हेरिएंट 16GB RAM + 256GB स्टोरेजसह येतो.
OnePlus 12R Smartphone : तुम्ही जर वनप्लस स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर, OnePlus ने या वर्षाच्या सुरुवातीला एक नवीन स्मार्टफोन (Smartphone) सीरीज लॉन्च केली. या सीरिजमधून कंपनीने OnePlus 12 आणि OnePlus 12R असे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री देखील जोरात सुरु आहे. पण, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी OnePlus 12R चे टॉप व्हेरिएंट खरेदी करणाऱ्या यूजर्सना रिफंड ऑफर करतेय अशा बातम्या येतायत. याचाच अर्थ ज्या ग्राहकांनी OnePlus 12R चा टॉप व्हेरिएंट म्हणजेच 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट खरेदी केला आहे अशा ग्राहकांना कंपनी रिफंड करणार आहे. पण, यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर, याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
OnePlus ने केला चुकीचा प्रचार
खरंतर, OnePlus ने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला होता. OnePlus 12R हा 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो आणि दुसरा व्हेरिएंट 16GB RAM + 256GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन लॉन्च करताना कंपनीने अशी माहिती दिली होती की, या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये म्हणजेच 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटमध्ये UFS 4.0 स्टोरेज फीचर आहे, जे OnePlus 12 मध्ये देखील आहे. याशिवाय, कंपनीने असेही सांगितले होते की, या स्मार्टफोनच्या फक्त बेस व्हेरिएंटमध्ये म्हणजेच 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटमध्ये UFS 3.1 स्टोरेजची सुविधा आहे.
मात्र, आता कंपनीने OnePlus 12R च्या टॉप व्हेरिएंटसाठी जो दावा केलेला होता तो चुकीचा ठरला आहे. कारण या स्मार्टफोनमध्ये 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह UFS 3.1 स्टोरेज फीचर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे फीचर कंपनीच्या जुन्या मॉडेल म्हणजेच OnePlus 11R सह अनेक मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या या चुकीच्या जाहिरातीमुळे कंपनीला यूजर्सना पूर्ण पैसे परत करावे लागणार आहेत.
ग्राहकांना रिफंड करावा लागणार
वनप्लसचे अध्यक्ष आणि सीओओ किंडर लियू यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत फोरम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "तुमच्या सहनशीलतेबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मी तुम्हाला कळवू इच्छितो की आमच्या ग्राहक सेवेला या परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे." आणि ते ग्राहकांना मदत करतील. जे गेल्या काही आठवड्यांपासून त्रस्त आहेत." त्यांनी पुढे लिहिले की, जर तुम्ही OnePlus 12R 256GB व्हेरिएंट खरेदी केलं असेल तर अशा ग्राहकांना रिफंड देण्यात येईल. मात्र, यासाठी ग्राहकांना 16 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
So, OnePlus is offering a refund to the OnePlus 12R (256GB variant) buyers until March 16th.#OnePlus #OnePlus12R pic.twitter.com/i12R9R2Afb
— Mukul Sharma (@stufflistings) February 16, 2024