एक्स्प्लोर

नव्याकोऱ्या वनप्लस 12 वर पहिल्याच सेलमध्ये बंपर सूट; पण काय करावं लागणार?

OnePlus 12 : वनप्लस 12 दमदार फिचर्ससह युजर्सच्या भेटीसाठी आला आहे. पण पहिल्याच सेलमध्ये स्मार्टफोनवर दमदार डिस्काउंट मिळत आहे.

OnePlus 12 : मुंबई : लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड OnePlus कडून नवाकोरा OnePlus 12 फ्लॅगशिप फोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. साधारणतः एका आठवड्यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू होणार आहे. कंपनीचं सर्वात पॉवरफुल डिव्हाईस म्हणून, हा वनप्लस 12 स्मार्टफोन सीरिजची चर्चा गॅझेटप्रेमींमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे. वनप्लस 12 दमदार फिचर्ससह युजर्सच्या भेटीसाठी आला आहे. दमदार परफॉर्मन्स आणि हायटेक कॅमेऱ्यासाठी युजर्समध्ये लॉन्चिंगपूर्वीपासूनच याची क्रेझ पाहायला मिळाली होती. असं असलं तरीदेखील पहिल्या सेलमध्येच वनप्लसवर कंपनीकडून बक्कळ डिस्काउंट देण्यात आला आहे. स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि फ्लॅगशिप कॅमेरासह भारतात लॉन्च करण्यात आला आहे. 

नवा OnePlus फ्लॅगशिप फोन कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोअर तसेच ऑनलाईन शॉपिंग साईट Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची विक्री आज 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे, आणि बँक ऑफर्स व्यतिरिक्त त्यावर एक्सचेंज डिस्काउंट देखील युजर्सना मिळणार आहे. OnePlus 12 सह लॉन्च करण्यात आलेला, OnePlus 12R ही बाजारात आजपासून उपलब्ध करुन देण्यात येणार असून 6 फेब्रुवारीपासून याची बाजारात विक्री सुरू होईल. वनप्लस 12 सीरिजमधील OnePlus 12R हा एक बजेट स्मार्टफोन असणार आहे. 

OnePlus 12 ची किंमत आणि डिस्काउंट 

भारतीय बाजारात OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत त्याच्या 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटसाठी 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. पहिल्या सेल दरम्यान, तुम्हाला ICICI बँक कार्ड किंवा OneCard क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांची झटपट सूट मिळेल.

जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, तर वनप्लस 12 घेताना तुम्हाला मोठं डिस्काउंट मिळू शकतं. मात्र, याबाबत कंपनीनं एक अट घातली आहे. तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटमध्ये केवळ एकच ऑफर घेऊ शकणार आहात. OnePlus 12 सिल्की ब्लॅक आणि फ्लोई एमरल्ड अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. 

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 12 स्मार्टफोन 6.82 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट, Dolby Vision आणि 4500nits च्या पीक ब्राईटनेससोबत मिळतो आणि यावर गोरिला ग्लास विक्टस 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे. Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर व्यतिरिक्त यामध्ये वेपर-चेंबर कूलिंग सिस्टिम मिळतो. फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony LYT-808 प्रायमरी सेंसरसह 64MP 3x पेरीस्कोप टेलीफोटो कॅमरा आणि 48MP अल्ट्रा-वाइट सेंसर मिळतो. 

32MP सेल्फी कॅमरा असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Android 14 वर आधारित OxygenOS 14 सॉफ्टवेयर स्क्रिन मिळणार आहे. OnePlus 12 मध्ये 5400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबत 5400mAh आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. त्यासोबतच 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगचा फायदाही मिळणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget