एक्स्प्लोर

New Rule For Online Gaming: सट्टेबाजी अन् जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमवर बंदी; केंद्र सरकारकडून नवे नियम जारी

Online Gaming Rules In India: ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. सट्टेबाजी, बेटिंग आणि जुगाराशी संबंधित गेमवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, देखरेखीसाठी यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे.

Online Gaming Rules In India:  केंद्र सरकारने (Union Government) ऑनलाईन गेमिंगसाठी (Online Gaming) नवे नियम जारी केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या जाहिरातीं विरुद्ध नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन गेमिंससंदर्भातील जाहिराती प्रसारित न करण्याचा सल्लाही माध्यमांना देण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगसाठी (Online Games) नवे नियम जारी केले असून त्याद्वारे कोणत्याही प्रकारचा सट्टा आणि जुगाराला मनाई करण्यात आली आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबतची माहिती दिली. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांची यापुढे KYC पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच, माध्यमसंस्थांसाठी देखील काही मार्गदर्शक तत्व बनवण्यात आली आहेत. मध्यंतरी वर्तमानपत्रं आणि अन्य काही प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन गेमिंगबाबत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. त्यावर केंद्र सरकरानं तीव्र आक्षेप घेतला आहे.  

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "आम्ही एक फ्रेमवर्क तयार करत आहोत. ज्यामार्फत SRO द्वारे कोणत्या ऑनलाईन गेमला परवानगी देणं योग्य असेल,  हे ठरवेलं जाऊ शकेल. SROs देखील अनेक असतील." ऑनलाईन गेमला मान्यता देण्याचा निर्णय या गेममध्ये कोणत्याही प्रकारे बेटिंग किंवा जुगाराचा समावेश नाही, हे लक्षात घेऊन घेण्यात येईल. ऑनलाईन गेमवर बेट लावली जात असल्याचं SRO ला आढळल्यास, तो त्यास मान्यता देणार नाही, असंही राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं. 

केंद्रीय मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, ऑनलाईन गेमिंग ही स्टार्टअपसाठी मोठी संधी म्हणून उदयास आली आहे. नव्या नियमांमुळे त्यांच्या परवानगीबाबतची संदिग्धता दूर होणार आहे. बेटिंग आणि जुगाराशी संबंधित जाहिरातींबाबतही सरकारनं इशारा दिला आहे. सट्टेबाजीशी संबंधित प्लॅटफॉर्मचा प्रचार करू नये, असं माध्यमांना सांगण्यात आलं आहे.  

केंद्र सरकारनं उचललेल्या पावलाचं गेमिंग फेडरेशनकडून स्वागत 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशननं ऑनलाईन गेमिंगसाठी नव्या नियमांचं स्वागत केलं आहे. फेडरेशनचे सीईओ रोलँड लँडर्स यांनी ऑनलाईन गेमिंगच्या नियमनासाठी केंद्र सरकारनं उचललेलं पाऊल निर्णायक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, गेमर्स आणि ऑनलाईन गेमिंग उद्योग बऱ्याच काळापासून याची मागणी करत होते. हे गेमिंग उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास प्रेरित करेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

CNG PNG Price:  केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर कमी होणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget