Facebook And Instagram Cross Communication Chats : फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं 'हे' फिचर बंद होणार; मेटा कंपनीची मोठी घोषणा
फेसबुक-इन्स्टाग्राममधील क्रॉस-अॅप कम्युनिकेशन डिसेंबरच्या मध्यापासून बंद होणार,अशी घोषणा मेटाने कंपनीने केली आहे. जर तुम्हाला नवीन कोणाशी चॅटिंग करायचं असेल तर मेसेंजर किंवा फेसबुकवर स्विच करावं लागेल.
![Facebook And Instagram Cross Communication Chats : फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं 'हे' फिचर बंद होणार; मेटा कंपनीची मोठी घोषणा Meta Announcement For Facebook And Instagram Chats meta to discontinue cross app communication chats on instagram Facebook And Instagram Cross Communication Chats : फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं 'हे' फिचर बंद होणार; मेटा कंपनीची मोठी घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/07/2a3d979370855f862574bd6e1cbd50471701946341113442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Facebook And Instagram Cross Communication Chats : फेसबुक-इन्स्टाग्राममधील क्रॉस-अॅप कम्युनिकेशन डिसेंबरच्या मध्यापासून बंद होणार असल्याची घोषणा सोशल मीडिया कंपनी मेटाने केली आहे. इन्स्टाग्रामवरील एका नव्या सपोर्ट पेज अपडेटनुसार यापुढे इन्स्टाग्राम आणि (Instagram Chats) फेसबुकवर क्रॉस (Facebook) चॅट करता येणार नाही. जर तुम्हाला नवीन कोणाशी चॅटिंग करायचं असेल तर तुम्हाला मेसेंजर किंवा फेसबुकवर स्विच करावं लागेल.
Insta Chats : जुन्या चॅट्स नुकसान होणार नाही...
फेसबुक अकाऊंटसह जुने इन्स्टाग्राम चॅट वन-वे स्ट्रीट होती म्हणजेच ते डिलीट होणार नाही. तुम्ही ते वाचू शकता परंतु रिप्लाय देऊ शकणार नाही. याव्यतिरिक्त, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटसह केलेले कोणतेही चॅट त्यांच्या फेसबुक किंवा मेसेंजर इनबॉक्समध्ये ट्रांसफर होणार नाहीत. मेटाने 2020 मध्ये इन्स्टाग्रामसाठी मेसेंजर सपोर्ट सादर केला, ज्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यांमध्ये क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग सुरू झाले. आता तीन वर्षांनंतर कंपनीने दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मएकत्र करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
हे फिचर कधी बंद होणार?
मेसेंजरमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर जोडले जाणार असताना मेटाने हा निर्णय घेतला आहे. फेसबुक मेसेंजरवर हे फीचर या वर्षाच्या अखेरपर्यंत येऊ शकते, असा अंदाज आहे. इन्स्टाग्राम सपोर्ट पेजवर कंपनीने 1 डिसेंबरपासून क्रॉस अॅप कम्युनिकेशन चॅट बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या लोक फेसबूक आणि इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यात अनेकजण मेसेजींगसाठीदेखील वापर करतात. मात्र आता हे क्रॉस मेसेजींग बंद होणार आहे. त्यामुळे अनेक युझर्स हा बदल कसा स्विकारतात, हे पाहणं महत्वाचं असेल.
इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार 'हे' नवे फिचर
इन्स्टाग्रामने एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामुळे युजर्स केवळ 'क्लोज फ्रेंड्स'च्या छोट्या ग्रुपसोबत आपली पोस्ट शेअर करू शकतील. मार्क झुकेरबर्गने इन्स्टाग्रामवर आपल्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर घोषणा केली की हे फीचर युजर्सना मर्यादित फ्रेंड्ससाठी पोस्ट आणि रील्स पोस्ट करण्याचा ऑप्शन देत आहे. युजर्स आपल्या इन्स्टाग्राम फीडवर नवीन पोस्ट शेअर करताना 'ऑडियंस' निवडण्याचा वेगळा पर्याय शोधू शकतात. 'ऑडियंस' बटणावर टॅप केल्यास एक पॉप-अप विंडो उघडेल आणि युजर्सना विचारेल की ते त्यांच्या 'क्लोज फ्रेंड्स' यादीसह पोस्ट करू इच्छितात का? विंडोमध्ये लिस्ट एडिट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Instagram Hack : Instagram Accound हॅक झालंय हे कसं ओळखाल? 'या' स्टेप्स फॉलो करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)