Meta Threads Web Version Starts Rolling Out : मेटाने नुकत्याच लॉन्च केलेल्या थ्रेड्सचं (Threads) वेब व्हर्जन यूजर्ससाठी आणण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात बोलताना, मेटाने सांगितले की, प्लॅटफॉर्मवर व्यावसायिक यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी X (म्हणजेच पूर्वीचे ट्विटर) मागे सोडण्यासाठी, त्यांनी वेब व्हर्जनमध्ये त्यांचे मजकूर-प्रथम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रेड्स सादर केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन (इन्स्टाग्रामचं थ्रेड्स वेब व्हर्जन) आणण्यावर काम करत आहे. IANS च्या बातमीनुसार, थ्रेड्स यूजर्स पोस्ट करू शकतील, त्यांचे फीड पाहू शकतील आणि डेस्कटॉपवरून पोस्टशी संवाद साधू शकतील.


डेस्कटॉपवरील थ्रेड यूजर्स प्रोफाईल एडिट करू शकणार नाहीत


TechCrunch च्या अहवालानुसार, थ्रेड्स टीम येत्या आठवड्यात वेब अॅपला मोबाईलच्या बरोबरीने आणण्यासाठी आणखी वैशिष्ट्ये जोडण्यावर काम करत आहे. बातमीनुसार, डेस्कटॉपवरील थ्रेड यूजर्स त्यांचे प्रोफाईल एडिट करू शकणार नाहीत किंवा इन्स्टाग्राम DM वर थ्रेड पाठवू शकणार नाहीत. 


एका यूजरच्या पोस्टला प्रतिसाद देताना, Ceo मोसेरी यांनी सांगितले होते की, डेस्कटॉप वेब फोल्ड करण्यायोग्य सपोर्टच्या खूप आधी असेल. आम्ही वेबवर जवळ आहोत आणि फोल्ड करण्यायोग्य वर काम करत नाही. मोसेरी म्हणाले की, कंपनी एक किंवा दोन आठवड्यांपासून थ्रेड्सच्या सुरुवातीच्या वेब व्हर्जनची इंटर्नल चाचणी करत होती.


लवकरच सर्व यूजर्स वेब व्हर्जन वापरण्यास सक्षम असतील


कंपनीचे म्हणणे आहे की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन रोल आउट सुरू झालं आहे. निवडक यूजर्स देखील ते वापरण्यास सक्षम आहेत. येत्या काही दिवसांत थ्रेड्सचं वेब व्हर्जन जगभरातील यूजर्ससाठी लॉन्च केले जाईल. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे.


एक्स (ट्विटर) अडचणीत येईल


थ्रेड्सचं वेब व्हर्जन आल्यानंतर ट्विटरचा त्रास वाढला आहे. कारण आता यूजर्स ट्विटरप्रमाणे वेबवरही पोस्ट करू शकणार आहेत. TweetDAC ला पर्याय म्हणून हे वेब व्हर्जन सुरु करण्यात आलं आहे.


मेटाने जुलै महिन्यात थ्रेड्स अॅप आणले होते. हे अॅप लॉन्च झाल्यापासून पाच दिवसांच्या आत, प्लॅटफॉर्मने 100 मिलियन साईन-अपचा आकडा गाठला होता. पण, त्याची लोकप्रियताही फार लवकर घसरली. 10 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, थ्रेड्स अॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनवरील दैनिक अॅक्टिव्ह यूजर्स केवळ एका महिन्यात 49.3 मिलियनहून 10.3 मिलियनपर्यंत कमी झाले.


महत्त्वाच्या बातम्या : 


ISRO Chandrayaan 3 : लॅण्डिंगच्या दोन दिवस आधी लॅण्डरने पाठवले चंद्राची अगदी जवळची छायाचित्रे, फोटो काढण्यासाठी विशेष कॅमेऱ्याचा वापर