Instagram Reels New Feature : इंस्टाग्राम हा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म आहे. लाखो लोक आजकाल इंस्टाग्राम वापरतात. विविध अपडेट्स नेहमीच इंस्टाग्रामवर येत असतात. आता अशातच नवीन एक फिचर इंस्टाग्रामध्ये येणार आहे. आतापर्यंत इंस्टाग्रामवर रीलसाठी फक्त एका मिनिटाची मर्यादा आहे. या एका मिनिटाच्या कालावधीत इंस्टाग्रामवर अनेक तरुण मंडळींपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने रील्स बनवतात. पण रील्स बनवणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण इंस्टाग्राम आता रील्सची वेळ मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे.


रीलसाठी आता इंस्टाग्राम तीन, पाच किंवा सात नाही तर चक्क दहा मिनिटांची वेळ मर्यादा ठेवण्याचा विचार करत आहे. या संदर्भात इंस्टाग्रामची चाचणीसुद्धा सुरू आहे. आजकाल अनेकजण इंस्टाग्रामवर विविध पद्धतीचे कंटेन्ट करून शेअर करत असतात. पण आता दहा मिनिटांची वेळ मर्यादामुळे विविध विषयांवर अधिकाअधिक माहिती देणे सोपे जाईल. Alessandro Paluzzi या रिव्हर्स इंजिनिअर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून इंस्टाग्रामच्या या अपडेटविषयी माहिती दिली. रील मर्यादा 10 मिनिटांपर्यंत वाढवून इंस्टाग्राम TikTok ला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे.


तर काही दिवसांपूर्वी मेटा कंपनीने घोषणा केली होती की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन (इंस्टाग्रामचं थ्रेड्स वेब व्हर्जन) आणण्यावर काम करत आहे. हे काम आता पूर्ण झाले असून तु्म्ही आता वेबच्या मदतीने मेटाने थ्रेड्स ओपन करू शकता. याचाच अर्थ थ्रेड्स वापरण्याकरता वेब व्हर्जन सुरू झाले आहे. या वेब व्हर्जनमुळे यूजर्स थेट पोस्ट करू शकतील, त्यांचे फीड पाहू शकतील आणि डेस्कटॉपवरून पोस्टशी संवाद साधू शकतील.


थ्रेड्सचं (Threads) चे वेब व्हर्जन चालवण्याकरता तुम्हाला गूगलवर www.threads.net टाईप करावे लागेल. गूगल व्यतिरिक्त हे MacOS वर देखील ही Website ओपन होऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मेटा लवकरच या विषयावर लोकांना अपडेट करेल. 


युजर्स परत आणण्यासाठी कंपनीचे मोठे प्रयत्न


मेटा थ्रेड्सचं (Threads) वर यूजर्सला परत आणण्याकरता कंपनी मोठे प्रयत्न करत आहे. त्याकरता  शक्य तेवढे अपडेट्स देखील आणत आहे. आता वेब व्हर्जनद्वारे देखील, मेटा लोकांना अॅपवर परत आणू इच्छित आहे. तथापि, मेटाच्या वेब आवृत्तीमध्ये अद्याप बरेच काही येणे बाकी आहे. सध्या अॅपमध्ये जास्त वैशिष्ट्ये नाहीत. यामध्ये तुम्ही लाइट आणि डार्क मोडमध्ये स्विच करू शकता. वेब व्हर्जनमध्ये तुम्हाला अॅपसारखाच एक इंटरफेस मिळेल, ज्यामध्ये फीड, सर्च, पोस्ट, लाईक आणि प्रोफाइलचा पर्याय देण्यात आला आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Elon Musk : 'एक्स' देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! आता कोणत्याही फोन नंबरशिवाय X वर ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येणार