27th MALABAR Exercise | सिडनीत अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदलाचा 27वा थरारक मलबार युद्धसराव...
इंडो-पॅसिफिक (Indo-Pacific) प्रदेशातील चीनची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया हे चार देश एकत्र आले आहेत. (PTI Photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१९९२ पासून भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या चार देशांचा दरवर्षी संयुक्त युद्धसराव आयोजित केला जातो यालाच 'मलबार युद्धसराव' असं म्हणतात (PTI Photo)
यंदा २७वा युद्धसराव ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्यावर सिडनीजवळ सुरु आहे (PTI Photo)
भारताच्या वतीनं या युद्धाभ्यासात भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या नौका INS कोलकाता, INS सह्याद्री आणि तसेच P81 फ्लीट एअरक्राफ्ट सहभागी झालं आहे. (PTI Photo)
येत्या काळात क्वॉड देशांची सहमती असेल तर मलबार युद्धाभ्यासामध्ये इतर काही मित्र देशांचाही सहभाग केला जावू शकतो असं अमेरिकेच्या नौदल प्रमुखांनी म्हटलं आहे. (PTI Photo)
क्वाड देशांच्या या युद्धाभ्यासामुळे चीनचा मात्र थयथयाट झाल्याचं चित्र आहे. चीनने वेळोवेळी मलबार युद्धाभ्यासाला विरोध केला आहे. (PTI Photo)
हिंदी महासागरातील संपूर्ण वर्चस्वासाठी चीनने पावले उचलायला सुरुवात केली असून या भागातील अनेक देशांच्या सीमांवर आपले नौदल तैनात केलं आहे. (PTI Photo)
चीनच्या या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचा प्रयत्न आहे. (PTI Photo)