iPhone 14 वर मिळत आहे मोठी सूट, पहिल्यांदाच इतक्या स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी
Flipkart Big Saving Days Sale: जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे. कारण iPhone 14 हा ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सर्वात स्वस्त दरात उपलब्ध आहे.
Flipkart Big Saving Days Sale: जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे. कारण iPhone 14 हा ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सर्वात स्वस्त दरात उपलब्ध आहे. सध्या फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डे सेल (Flipkart Big Billion Days 2023) सुरू आहे. तुम्ही iPhone 14 चा 128GB व्हेरिएंट 66,999 रुपयांना खरेदी करू शकता. या मोबाईलची बाजारात किंमत 79,900 रुपये आहे. ग्राहकांना इतर अनेक ऑफर्सचाही लाभ दिला जात आहे.
तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करून iPhone 14 खरेदी केल्यास तुम्हाला 750 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासोबतच मोबाईल फोनवर 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही जुन्या फोन रिप्लेस करून iPhone 14 विकत घेतल्यास, तुम्हाला हा फोन अधिक स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. तसेच तुम्ही यावर आता 31 हजारांपेक्षा जास्त बचत करू शकता.
स्पेसिफिकेशन
iPhone 14 च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. मोबाईल फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आणि समोर 12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. iPhone 14 IOS16 वर काम करतो आणि A15 बायोनिक चिपसेट यात सपोर्ट करण्यात आला आहे. तुम्ही लाल, निळा, मिडनाईट ब्लॅक, पर्पल, स्टारलाईट आणि अलीकडे जोडलेल्या पिवळ्या रंगात देखील iPhone 14 खरेदी करू शकता.
6000 mAh बॅटरीसह खरेदी करा स्वस्त
Flipkart वरून तुम्ही Infinix HOT 20 Play चे 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट 8,199 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला मोबाईल फोनवर 31% सूट दिली जात आहे. याशिवाय तुम्हाला 7,650 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10% सूट दिली जात आहे. मोबाईल फोन MediaTek G37 प्रोसेसरवर काम करतो आणि यात 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
14 मार्च रोजी पोको लॉन्च करणार बजेट स्मार्टफोन
Poco 14 मार्च रोजी भारतात Poco x5 5G मोबाईल फोन लॉन्च करेल. याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला Snapdragon 695 SoC आणि 5000 mAh बॅटरी मिळेल. मोबाईल फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
इतर बातमी:
फक्त 4 हजारात Samsung चा हा 5G फोन घेऊन जा घरी, जाणून घ्या काय आहे ऑफर