ट्वीटरवर सर्वांत मोठा बदल, एलन मस्कने दिली मोठी अपडेट, आता तुमचे लाईक्स...
Elon Musk on X Platform : उद्योगपती एलन मस्क यांनी बुधवारी (दि.13) ट्वीटर म्हणजे X बाबत मोठी अपडेट दिली आहे. आता X च्या वापरकर्त्यांना लाईक्स लपवता येणार आहे.
Elon Musk on X Platform : उद्योगपती एलन मस्क यांनी बुधवारी (दि.13) ट्वीटर म्हणजे X बाबत मोठी अपडेट दिली आहे. आता X च्या वापरकर्त्यांना लाईक्स लपवता येणार आहे. डिफॉर्टरित्या हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. X बुधवारपासून प्रायवेट लाईक लाँच करणार आहे. याचा अर्थ असा होईल की प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांच्या लाईक केलेल्या पोस्ट बाय डीफॉल्ट लपवल्या जातील.
This week we’re making Likes private for everyone to better protect your privacy.
— Engineering (@XEng) June 11, 2024
– You will still be able to see posts you have liked (but others cannot).
– Like count and other metrics for your own posts will still show up under notifications.
– You will no longer see who…
आगामी बदल वापरकर्त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेचे संरक्षण करण्यासाठी
X चे अभियांत्रिकी संचालक Haofei Wang गेल्या महिन्यात म्हणाले होते की, आगामी बदल वापरकर्त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेचे संरक्षण करण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, ट्रोल होण्याच्या भीतीने किंवा त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी अनेक वापरकर्त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार, लाईक्स फक्त तुम्हाला आणि कंटेट पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला दिसतील. "तुमच्या लाईक्सबद्दल सूचना ज्या व्यक्तीने पोस्ट केली आहे त्यांना पाठवल्या जातील. इतर कोणालाही नाही, त्याबाबत माहिती दिली जाणार नाही.
वापरकर्त्यांना या आठवड्यापासून ट्विटरवर हा बदल पाहायला मिळेल
X च्या इंजिनिअरिंग समूहाच्या पोस्टनुसार, वापरकर्त्यांना या आठवड्यापासून ट्विटरवर हा बदल पाहायला मिळेल. या आठवड्यानंतर, X वरील पोस्टवरील लाईक्स खासगी असतील. म्हणजेच आता पोस्ट करणाऱ्या युजर्सनाच कळेल की पोस्टला किती लाईक्स आल्या आहेत आणि पोस्ट कोणी लाईक केली आहे. X ने केलेल्या पोस्टनुसार, तुमच्या पोस्टवर येणाऱ्या प्रत्येक लाईकची सूचना तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये कळेल की तुमची पोस्ट कोणी लाईक केली आहे. पोस्टला किती व्ह्यूज मिळाले आहेत? याबाबतची माहितीही तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्येच मिळेल.
Important change: your likes are now private https://t.co/acUL8HqjUJ
— Elon Musk (@elonmusk) June 12, 2024
इतर महत्वाच्या बातम्या