ChatGPT ची जबरदस्त कामगिरी, सर्वात कमी वेळात मिळवले 100 मिलियनहून अधिक यूजर्स
ChatGPT: गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपन एआयने चॅट जीपीटी लाईव्ह केले होते. केवळ 1 आठवड्यात या चॅटबॉटने ते केले जे मोठ्या दिग्गज टेक कंपन्याही करू शकल्या नाहीत.
ChatGPT: गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपन एआयने चॅट जीपीटी लाईव्ह केले होते. केवळ 1 आठवड्यात या चॅटबॉटने ते केले जे मोठ्या दिग्गज टेक कंपन्याही करू शकल्या नाहीत. तेव्हापासून ते आजतागायत सतत हे चर्चेत राहिले आहे. दरम्यान, ओपनएआयच्या चॅटबॉट 'चॅट जीपीटी'ने जानेवारीमध्ये 100 मिलियन युजर्सची संख्या ओलांडली आहे. चॅट जीबीटी हे एआय जगातील पहिले असे साधन आहे, ज्याने इतक्या कमी वेळात 100 मिलियनचा आकडा गाठला आहे.
UBS च्या एका रिपोर्टनुसार, जो Similarweb वर आधारित आहे. चॅट GPT ला जानेवारीमध्ये दररोज 13 मिलियन युनिक युजर्स आले, जे डिसेंबरच्या तुलनेत दुप्पट होते. यूबीएसच्या अभ्यासात असे सांगण्यात आले की, दोन दशकांत सर्वात जलद वेळेत एवढा मोठा युजर्स आधार मिळवणारा हा पहिलाच ग्राहक अनुप्रयोग आहे. सेन्सर टॉवरच्या माहितीनुसार, टिकटॉकला 100 मिलियन ट्रॅफिक गाठण्यासाठी सुमारे 9 महिने लागले तर इंस्टाग्रामला येथे पोहोचण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागली.
ओपन AI चा चॅटबॉट तुमच्यासाठी लेख, निबंध, विनोद आणि अगदी कविता सहज करू शकतो. ओपन एआय ही एक खाजगी कंपनी आहे जी मायक्रोसॉफ्ट द्वारे समर्थित आहे. चॅटबॉटच्या माध्यमातून गुगलच्या सर्च व्यवसायाला तगडी स्पर्धा देण्याचा मायक्रोसॉफ्टचा उद्देश आहे.
ChatGPT: चॅट जीपीटीचा पेड प्लॅन सुरू
लोकप्रियता पाहून ओपन एआयने 'चॅट जीपीटी'चा पेड प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीने लोकांसाठी 'चॅट जीपीटी प्लस सबस्क्रिप्शन' लाईव्ह केले आहे. ज्यासाठी त्यांना दरमहा 20 डॉलर्स द्यावे लागतील. हा चॅटबॉट सामान्य युजसाच्या तुलनेत पेड सबस्क्रिप्शन युजर्सला चांगली सेवा, अपडेट्स आणि अचूक उत्तरे देईल.
दरम्यान, ओपन एआयचा चॅटबॉट 'चॅट जीपीटी' गुगलसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण हा चॅटबॉट तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे गुगलपेक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. जिथे गुगल तुम्हाला काहीही शोधताना अनेक लिंक्स दाखवते. तर चॅट जीपीटी हे करत नाही. हे कमी शब्दात प्रश्नांची अचूक उत्तरे देते. येत्या 1 ते 2 वर्षात चॅट जीपीटीमुळे गुगलचा सर्च व्यवसाय संपुष्टात येईल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. चॅट जीपीटीमुळे गुगल इतका वैतागला झाला आहे की, कंपनीने स्वतःसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे.
इतर महत्वाची बातमी: