एक्स्प्लोर

Apple Release F1 Haptic Trailer : F1 चा थरार आता iPhone वर! ॲपलने आणला हॅप्टिक ट्रेलर, अनुभवा रेसिंगचा रोमांचक अनुभव!

रेसट्रॅक वर सुसाट धावणाऱ्या फॉर्म्युला वन कार्सचा फिल तुमच्या आयफोन वरती आता अनुभवायला मिळणार आहे, जो ऑनस्क्रीन अ‍ॅक्शनचा फिल आता थरथरणाऱ्या मोबाईलमध्ये अनुभवता येणार आहे...  

AI चे चमत्कार आता आपल्यासाठी काही नवीन राहिलेले नाहीयेत, अगदी सहजपणे तुम्ही आम्ही दिवसभरात चालता बोलता चॅट GPT वापरात आहोत,एवढंच काय तर ज्यांनी जी मंडळी प्ले स्टेशनवर गेम्स खेळतात त्याचे कंट्रोलर मध्ये Rumble Motor असते ज्याने तुम्हाला गेम्स खेळताना फायरिंग ते अ‍ॅक्शन मध्ये व्हायब्रेशन चा फील मिळतो आणि तुम्ही खरोखर मार खाताय किंवा बंदूक चालवताय याचा फील येतो... असेच VR Box - Smart Glasses सुद्धा आज घरोघरी पाहायला मिळत आहेत...  अश्यातच प्रथमच अ‍ॅपलने apple tv वरती F1 सिनेमाचा haptic trailer लॉन्च केलेला आहे. 

रेसट्रॅक वर सुसाट धावणाऱ्या फॉर्म्युला वन कार्सचा फिल तुमच्या आयफोन वरती आता अनुभवायला मिळणार आहे, अ‍ॅपलने आगामी रेसिंग चित्रपट F1 चा "हॅप्टिक ट्रेलर" रिलीज केला आहे जो आयफोनमध्ये रेसिंग सेन्सेशनचा फील तुम्हाला देतो. या नव्या ट्रेलरमध्ये आयफोन मध्ये असणाऱ्या फोनच्या हॅप्टिक इंजिनचा वापर केला आहे जो ऑनस्क्रीन अ‍ॅक्शनचा फिल आता थरथरणाऱ्या मोबाईलमध्ये अनुभवता येणार आहे...  

हॅप्टिक ट्रेलर म्हणजे काय? 

हॅप्टिक ट्रेलर (Haptic Trailer) ही एक तंत्रज्ञानावर आधारित अनोखी अनुभवात्मक संकल्पना आहे, जी प्रेक्षकाला केवळ पाहायला नाही तर ‘अनुभवायला’ मिळणार आहे, पारंपरिक ट्रेलर केवळ दृश्य आणि ध्वनीद्वारे चित्रपटाची झलक दाखवतो, तर हॅप्टिक ट्रेलरमध्ये एक पायरी पुढे जाऊन नवा अनुभव आपल्याला मिळतो! हा ट्रेलर पाहताना मोबाईल हातात धरल्यावर ट्रेलर मधील सिन शॉट्स नुसार आयफोन युजरच्या हातांना व्हायब्रेशन म्हणजेच कंपन, स्पर्श आणि हालचालींच्या माध्यमातून त्या व्हिडीओचा अनुभव प्रत्यक्षात देतो

हॅप्टिक तंत्रज्ञान कसं काम करतं?

उदाहरणार्थ, जर ट्रेलरमध्ये कोणीतरी जोरात दरवाजा आपटतो, तर प्रेक्षकाच्या हातातला मोबाईल मध्ये त्याच क्षणी एक हलकी कंपन होते.यामुळे गोष्ट "पाहणं" नसून "जगणं" वाटते. F1 च्या ट्रेलर मध्ये रेसट्रॅकवर जशी कार पळते त्या इंजिनचं  व्हायब्रेशन तो व्हिडीओ पाहताना 
ऐकताना हातालाही जाणवतो!

हॅप्टिक फीचरचे वैशिष्ट्ये कोणती?

इमर्सिव अनुभव : ट्रेलर पाहताना आपण त्या कथानकाचा भाग झाल्यासारखा वाटतो.
ऑडिओ-विज्युअल प्लस टच : पारंपरिक आवाज आणि दृश्याबरोबरच शरीरावर थेट व्हायब्रेशन फील मिळतो 
VR/AR आणि हॅप्टिक टेक्नॉलॉजी यांचा संगम : दोन्हीचा एकत्रित वापर करून अजून जास्त खरा आणि आकर्षक अनुभव व्हिडीओ पाहताना मिळतो 
चित्रपट प्रमोशन : हल्ली थरारपट, अ‍ॅक्शन किंवा साय-फाय चित्रपटासाठी प्रभावी ट्रेलर अनुभव देण्यासाठी वापर वाढताना दिसेल 
थीम पार्क किंवा VR केंद्रांमध्ये स्पेशल शो मध्ये देखील हॅप्टिक तंत्रज्ञान वापरताना पाहिले जाते आहे 

F1 सिनेमाबद्दल

F1 हा जोसेफ कोसिंस्की दिग्दर्शित अमेरिकन स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा  आहे, ज्याची पटकथा एहरेन क्रुगर यांनी लिहिलेली आहे, हा सिनेमा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आधारित आहे, या चित्रपटात ब्रॅड पिट, डॅमसन इद्रिस, केरी कॉन्डोन, टोबियास मेंझीज आणि जेवियर बर्डेम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हा सिनेमा 27 जून 2025 ला भारतात प्रदर्शित होईल. 

F1 हॅप्टिक ट्रेलर कुठे पाहता येईल? 

हॅप्टिक ट्रेलर पाहण्यासाठी तुमच्या आयफोनवर Aaple tv मध्ये जावून, हा ट्रेलर पाहता येईल आणि  हॅप्टिक फिचर अनुभवता येईल, अँड्रॉइड युजर्सना मात्र हा हॅप्टिक ट्रेलर पाहता येणार नाही, कारण सध्या तरी haptic engine चं तंत्रज्ञान फक्त Apple मध्ये असल्याचं पाहायला मिळत असल्याने, या प्रथमच आलेल्या F1 हॅप्टिक ट्रेलर ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. 

जर तुमच्या कडेही आयफोन असेल तर, हा ट्रेलर नक्की बघा, आणि कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका!

एबीपी माझा मध्ये 2020 ते 2025 सहा वर्ष Associate Producer पदावर कामाचा अनुभव, मागील काही वर्षांपासून Multimedia, Edit, Shoot, Graphics, Social Media तसेच टेक गॅजेट्स, मनोरंजन, सिनेमा, पब्लिसिटी विविध क्षेत्रात कामाचा अनुभव, सामाजिक तसेच ट्रेंडिंग विषयांवर ब्लॉग लेखन!  डायनॅमिक मीडिया प्रोफेशनल, व्हिडिओ प्रोडक्शन, एडिटिंग आणि कंटेंट मॅनेजमेंटमध्ये प्रत्यक्ष अनुभव, स्क्रिप्ट लेखन, SEO, YouTube ऑपरेशन्स आणि लेखन यामध्ये प्रावीण्य, विशेषतः मनोरंजन आणि ट्रेंडिंग बातम्या या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित. ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया, ChatGPT, AI-आधारित टूल्सवर प्रावीण्य!

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Embed widget