एक्स्प्लोर

Amazon Great Republic Day Sale: अॅमेझॉनकडून ग्रेट रिपब्लिक डे सेलची घोषणा, iPhone सह इतर स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट ऑफर्स

Amazon Great Republic Day Sale: Amazon ने आपल्या नवीन सेलची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या सेलमध्ये यूजर्सना आयफोनसह अनेक स्मार्टफोन्स आणि इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

मुंबई : नवीन वर्ष सुरू झाले आहे परंतु Amazon किंवा Flipkart वर अद्याप नवीन सेल सुरू झालेला नाही. मात्र, आता अॅमेझॉनने आपला नवीन सेल जाहीर केला आहे. Amazon च्या या नवीन सेलचे नाव Amazon Great India Republic Days Sale असे आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. या सेलमध्ये अॅमेझॉनकडून अनेक भन्नाट ऑफर्स त्यांच्या ग्राहकांना दिल्या जातात. यामध्ये अनेक गोष्टी अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होतात. 

कधी सुरु होणार सेल? 

ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइट Amazon साठी संपूर्ण वर्षातला हा सर्वात मोठा सेल असतो. कंपनी दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिक डे सेलची घोषणा करते. यावेळी देखील या सेलची घोषणा करताना Amazon ने देखील आपले पेज लाईव्ह केले आहे. परंतु अद्याप या सेलच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. 

Amazon 15 जानेवारीनंतर हा सेल सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान कंपनी या सेलची लवकरच घोषणा करेल. . या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon ने यासाठी SBI सोबत भागीदारी केली आहे आणि या अंतर्गत यूजर्सना कार्डवर 10% सूट मिळेल.

कोणत्या स्मार्टफोनवर मिळणार सूट?

या Amazon सेलमध्ये, वापरकर्त्यांना बजेट श्रेणीपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत सर्व स्मार्टफोन्सवर सूट आणि इतर ऑफर मिळतील. स्मार्टफोन व्यतिरिक्त लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्ट टीव्हीसह विविध श्रेणीतील अनेक वस्तूंवर ऑफर उपलब्ध होणार आहेत. 

या सेलमध्ये यूजर्स 5000 रुपयांच्या रेंजमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतील. नुकत्याच लाँच झालेल्या Redmi Note 13 मालिकेची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये असेल. कंपनी सेलमध्ये iPhone 13 देखील 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकू शकते. याशिवाय, मिडरेंजमध्ये येणाऱ्या OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत देखील त्याच्या सर्व प्रकारांमध्ये किमान 2,000 रुपयांनी कमी केली जाऊ शकते.

फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक उत्पादनांच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही ऑफर्सचा खुलासा कंपनीने केला आहे.

फ्लिपकार्टने या सेलसाठी एक मायक्रो पेज तयार केले आहे, ज्यामध्ये सेलमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे ऑफर्स प्रॉडक्टनुसार असेल. ई-कॉमर्स वेबसाइटवरील या सेलमध्ये इयरबड्स आणि इयरफोन्स 599 रुपयांना मिळणार आहेत. याशिवाय 399 रुपयांना ट्रिमर खरेदी करता येणार आहेत. एवढंच नाही तर सेलमध्ये बेस्ट सेलिंग लॅपटॉप 12,990 रुपयांपासून खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा : 

Google Chrome : नवीन वर्षात गुगलने युजर्सना दिले स्पेशल गिफ्ट, आता कोणतीही वेबसाईट ट्रॅक नाही करू शकणार तुमचा डाटा! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget