(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yashasvi Jaiswal : इंग्रजांना 'यशस्वी' घाम फोडला! जैस्वालच्या दमदार शतकाने टीम इंडियाची भक्कम सुरुवात
विशाखापट्टणममध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या सामन्यात जयस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. डावाच्या 49व्या षटकात टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार ठोकत दुसऱ्या शतकाची नोंद केली.
Yashasvi Jaiswal, IND vs ENG : यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली. विशाखापट्टणममध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या सामन्यात जयस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. डावाच्या 49व्या षटकात टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार ठोकत दुसऱ्या शतकाची नोंद केली.
A TEST HUNDRED WITH A SIX...!!! 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2024
- Yashasvi Jaiswal special in Vizag.pic.twitter.com/C3QuPjjRBQ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी सलामीला आले. रोहित 14 धावा करून बाद झाला, पण यशस्वीने भक्कम सामना केला. यशस्वीच्या शानदार खेळीमुळे भारताने 63 षटकांत 3 गडी गमावत 225 धावा केल्या आहेत.
Team India 0-1 in the series, Yashasvi Jaiswal who gave his best in the previous match, steps up once again and scores a century.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2024
- Jaiswal is already a superstar at the age of 22....!!! 🇮🇳 pic.twitter.com/cjZArkBtBc
यशस्वीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची इनिंग खेळली होती. जुलै 2023 मध्ये झालेल्या सामन्यात यशस्वीने 387 चेंडूंचा सामना केला आणि 16 चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर त्याने अर्धशतकही झळकावले होते.
Yashasvi Jaiswal has 3 Hundreds in International cricket from just 26 innings at the age of 22. 🫡
— Johns. (@CricCrazyJohns) February 2, 2024
- The future star. 🇮🇳 pic.twitter.com/gfDUJbs5Fs
हैदराबादमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडने हा सामना 28 धावांनी जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वीने 74 चेंडूंचा सामना करत 80 धावा केल्या होत्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. दुसऱ्या डावात 15 धावा करून यशस्वी बाद झाला होता.
HUNDRED FOR YASHASVI JAISWAL....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) February 2, 2024
India 0-1 down in the series, lost Rohit Sharma early but youngster has shown the class in tough situation - What a knock, What a hundred - the star in making. 🇮🇳 pic.twitter.com/Y7oCNfVveB
यशस्वीने जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियासाठी डेब्यू टेस्ट मॅच खेळली होती. त्याने टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20मध्ये पदार्पण केले. तो हा सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला होता.
इतर महत्वाच्या बातम्या