एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या नरसिंग यादवविरोधात सुशीलकुमारचा शड्डू

मुंबई : रिओ ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी नरसिंग यादवशी आपली 'चाचणी कुस्ती' खेळवण्यात यावी, या मागणीसाठी पैलवान सुशीलकुमारनं आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिओच्या तिकीटासाठी महाराष्ट्राचा नरसिंग यादव आणि सलग दोन ऑलिम्पिकचा पदकविजेता सुशील कुमार या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व नरसिंग यादव करणार की सुशीलकुमार याचा निर्णय उद्या भारतीय कुस्ती फेडरेशनच्या बैठकीत होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच सुशीलकुमारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सोनपतमध्ये आयोजित ऑलिम्पिक सराव शिबीरात सुशीलकुमारचा समावेश झालेला नाही. त्यात केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतासाठी मी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला असून, मलाच संधी मिळायला हवी अशी मागणी नरसिंग यादवनं केली आहे. तर सुशीलकुमारनं नरसिंग यादवशी चाचणी कुस्ती खेळवण्यात यावी अशी मागणी केली.
भारतीय कुस्ती फेडरेशनच्या बैठकीत मंगळवारी निर्णय होण्यापूर्वीच सुशीलकुमारने दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















