WI vs IRE T20 WC 2022 : सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेता संघ यंदा सुपर 12 पूर्वीच स्पर्धेबाहेर, वेस्ट इंडीजचा आयर्लंडकडून 9 विकेट्सने पराभव
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2010 आणि 2012 साली खिशात घालणारा संघ वेस्ट इंडिज यंदा सुपर 12 मध्ये देखील जागा मिळवू शकलेला नाही, आयर्लंड संघाने त्यांना 9 विकेट्सने मात देत स्पर्धेबाहेर केलं आहे.
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रुप B मधील सुपर 12 साठी पात्रता फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने आयर्लंडवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ दोन पराभवांसह स्पर्धेबाहेर झाला आहे. विशेष म्हणजे 2010 आणि 2012 विश्वचषक विजेता वेस्ट इंडिज यंदा सुपर 12 मध्येही एन्ट्री मिळवू न शकल्याने स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत वेस्ट इंडिजने 146 धावा केल्या ज्याचा पाठलाग करताना आयर्लंडने केवळ एक गडी गमावत 17.3 षटकांत 150 धावा केल्या. अनुभवी पॉल स्टर्लिंग याने नाबाद 66 तर लॉर्कन टकरने नाबाद 45 धावांची दमदार भागिदारी यावेळी केली. यासोबतच आयर्लंडचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला आहे.
Ireland are through to the Super 12 🎉
— ICC (@ICC) October 21, 2022
A comprehensive performance in Hobart sees them knocking West Indies out of the tournament#T20WorldCup |#IREvWI | 📝: https://t.co/LNaSAJSEKW pic.twitter.com/iT0mYvnNzP
सुपर 12 साठी ग्रुप B मधून कोण पात्र ठरणार यासाठी नुकताच आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पार पडला. यावेळी नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने आधी फलंदाजी निवडली. ज्यानंतर त्यांच्या खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. केवळ ब्रँडन किंग याने 62 धावांत एकहाती झुंज दिल्यामुळे संघाची धावसंख्या 146 धावांपर्यंत पोहोचली. त्याशिवाय सलामीवीर जे चार्ल्सने 24 ल्यूईस आणि पूरन यांनी प्रत्येकी 13 धावांची तर ओडियन स्मिथने नाबाद 19 धावांचं योगदान दिलं. आयर्लंडकडून गॅरथ डेलने याने सर्वाधिक 3 विकेट्स घेत वेस्ट इंडिजची धावसंख्या रोखण्यात मोठं योगदान दिलं.
त्यानंतर 147 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंड संघाची सुरुवातच अतिशय तुफान झाली 5 ओव्हरच्या आतच त्यांनी 50 हून अधिक धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँन्ड्र्यू बलबर्निनने विस्फोटक फलंदाजी सुरु केली. पण 23 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकार खेचून अँन्ड्र्यू बाद झाला. ज्यानंतर आलेल्या लॉर्कन टकरने देखील तुफान खेळी सुरु केली. त्याने 35 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याशिवाय आयर्लंडच्या संघात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या पॉल स्टर्लिंगने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 66 धावा केल्या, ज्यामुळे 17.3 षटकां केवळ एक गडी गमावून वेस्ट इंडिजने 9 विकेट्सने सामना जिंकला. यावेळी फलंदाजी उत्तम झाली असूनही गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या गॅरथ डेलने याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हे देखील वाचा-