Shaheen Afridi : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीची घातक गोलंदाजी, सराव सामन्यात विकेट घेत फलंदाजाला केलं Injured
T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार असून दोन्ही संघ सराव सामने खेळताना दिसून आले.
T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने टी-20 विश्वचषक 2022 मधून संघात पुनरागमन केलं आहे. बराच काळ दुखापतीशी झुंज दिल्यानंतर शाहीनने संघात पुनरागमन केलं असून आता तो तुफान फॉर्मात दिसत आहे. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामन्यात शाहीनने 2 विकेट्स घेतले आणि विशेष म्हणजे गोलंदाजीही चांगली केली. याचवेळी त्याने भेदक यॉर्कर टाकले असून शाहीनने टाकलेला एक शानदार यॉर्कर इतका खतरनाक होता की तो थेट फलंदाजाच्या पायाला जाऊन लागला ज्याने समोरील खेळाडूला काहीशी दुखापतही झाली.
नेमकं काय घडलं?
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषक 2022 पूर्वी नुकताच सराव सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णीत ठरला खरा पण सामन्यात पाकिस्तानचा स्टार शाहीन आफ्रिदीने कडक गोलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्धत्या सामन्यापूर्वी दिलासा मिळाला आहे. सामन्यात शाहीन आपली पहिलीच ओव्हर टाकत होता. सुरुवातीपासूनच त्याने भेदक यॉर्कर टाकण्यास सुरुवात केली आणि पाचव्याच चेंडूवर अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला पायचीत केलं. हाच चेंडू शाहीनने इतक्या वेगाने टाकला की चेंडू गुरबाजच्या पायाला जाऊन लागला ज्यामुळे चत्याला काहीशी दुखापतही झाली. दरम्यान संपूर्ण सामन्यात शाहीनने 4 ओव्हरध्ये 29 रन देत 2 विकेट्स घेतल्या. शाहीनची गोलंदाजी पाहता तो विश्वचषकासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
भारतीय फलंदाजांना धडकी
शाहीन आफ्रिदीने खेळलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार करता शाहीनने जवळपास 70% सामन्यांमध्ये पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. मागील वर्षी टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याक पहिल्याच षटकात शाहीनने रोहित शर्माची विकेट घेतली होती. यानंतर त्याने केएल राहुल आणि विराट कोहलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्या सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव ठरला होता, त्यामुळे यंदाही शाहीन अशीच भेदक गोलंदाजी करणार? का भारतीय फलंदाज त्याची धुलाई करणार हे पाहावे लागेल.
हे देखील वाचा-
SCO vs IRE T20 WC 2022 : कर्टीस कॅम्फरची स्फोटक खेळी, आयर्लंडचा स्कॉटलंडवर 6 गडी राखून दमदार विजय