Shadab Khan Run-Out : न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या शादाबचं अफलातून क्षेत्ररक्षण, रनआऊटचा 'हा' व्हिडीओ पाहिलात का?
T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघानं न्यूझीलंडवर सेमीफायनलच्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवला.
Shadab Khan NZ vs PAK : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) सामन्यात पाकिस्तान संघानं एकहाती दमदार खेळ दाखवत सामना 7 विकेट्सनी जिंकला. आधी भेदक गोलंदाजी करुन नंतर दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्ताननं विजय मिळवला. यावेळी पाकिस्तानसाठी एक महत्त्वाची विकेट ठरलेला न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वेचा रनआऊट स्टार ऑलराऊंडर शादाब खान याने केला. शादाबने एक अप्रतिम थ्रो करत कॉन्वेला धावचीत केलं असून या रनआऊटचा व्हिडीओ आयसीसीनं त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, हारिस रौफ 6 वी ओव्हर टाकत असताना कॉन्वेने मिड ऑनला चेंडू मारत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण तो पोहोचेपर्यंत मिड ऑनला उभ्या असलेल्या शादाबने अफलातून थ्रो करत थेट स्टम्प्स उडवले आणि कॉन्वेला धावचीत केला.
पाहा VIDEO
View this post on Instagram
सामन्याचा लेखा-जोखा
नाणेफेक जिंकत न्यूझीलंडनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर पाकिस्तानच्या बोलर्सनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंडनं सुरुवातीपासून विकेट गमावल्या. फिन अॅलन 4 तर कॉन्वे 21 धावा करुन बाद झाला. ग्लेन फिलिप्सही 6 धावांवर तंबूत परतला. ज्यानंतर मात्र केन आणि मिशेलनं डाव सावरला. केन 46 धावांवर बाद झाला तर मिशेलनं नाबाद 53 धावा केल्या. नीशमनंही नाबाद 16 धावाचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 2 तर मोहम्मद नवाजनं एक विकेट घेतली. ज्यानंतर 153 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं आज सुरुवातच दमदार केली. सलामीवीर बाबर आणि रिझवान यांना धडाकेबाज अशी अर्धशतकं ठोकली. बाबर 53 धावा करुन बाद झाला, पण त्यानंतर रिझवानने झुंज कायम ठेवली. मोहम्मद हारिसनेही 30 धावांची साथ रिझवानला दिली. रिझवाननं पाकिस्तानकडून सर्वाधिक 57 धावा केल्या. ज्यानंतर शानच्या नाबाद 3 धावांनी पाकिस्ताननं 19.1 षटकांत सामना जिंकत 7 विकेट्सनी विजय मिळवला.
13 नोव्हेबरला पाकिस्तानसमोर कोणाचं आव्हान
आता पाकिस्तान संघाने फायनलमध्ये धडक घेतली आहे. आता उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून त्यांच्यात जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध 13 नोव्हेंबरला फायनलचा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे.
हे देखील वाचा-