एक्स्प्लोर

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा आणखी एक पराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच

T20 World Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

T20 World Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. नुकताच नेदरलँड्सविरुद्ध पार पडलेल्या (IND vs NED) सामन्यात सुर्यकुमार यादवनं तुफानी अर्धशतक झळकावलं. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात त्यानं अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. या कामगिरीसह सूर्युकमार यादवच्या नावाव नव्या विक्रमांची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटनं सर्वाधिक अर्धशतक झळकावणार सूर्यकुमार यादव पहिला फलंदाज ठरलाय.

यावर्षी सूर्यकुमार यादवनं एका वर्षात आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पाच वेळा 200 च्या स्ट्राईक रेटनं 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यावर्षी त्यानं वेस्ट इंडीजविरुद्ध 31 चेंडूत 65 धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 55 चेंडूत 117 धावा, हाँगकाँगविरुद्ध 26 चेंडूत नाबाद 68 धावा, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 22 चेंडूत 61 धावा आणि नेदरलँड्सविरुद्ध 25 चेंडूत नाबाद 51 धावांची जबरदस्त खेळी दाखवलीय. 

सूर्यकुमार यादवचा जबरदस्त फॉर्म
सूर्यकुमार या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं यावर्षी 25 सामन्यात 41.28 च्या सरासरीनं 867 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 184.86 इतका राहिला आहे. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान सूर्याच्या बॅटमधून 52 षटकार निघाले आहेत. तसेच यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये 50 हून अधिक षटकार मारणारा सूर्यकुमार यादव एकमेव फलंदाज आहे.सूर्यानंतर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रिझवाननं यावर्षी 19 सामन्यांत 51.56 च्या सरासरीनं 825 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत रिझवानच्या बॅटमधून नऊ अर्धशतके झाली आहेत. रिझवानने 124.62 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत.

नेदरलँड्सविरुद्ध भारताचा 56 धावांनी विजय
नेदरलँड्सविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं 56 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित 20 षटकात दोन विकेट्स गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 123 धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, राट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकं ठोकली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडच्या संघाला अवघ्या 123 धावांवर रोखलं. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Embed widget