एक्स्प्लोर

PAK vs ENG, Toss Update : वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडनं नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, दोन्ही टीमकडून संघात एकही बदल नाही

T20 World Cup 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला अर्थात अंतिम सामना खेळवला जात असून इंग्लंडने नाणेफेक जिंकत आधी बोलिंग निवडली आहे.

Pakistan vs England, Toss Update : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) या यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याला (T20 World Cup 2022 Final) सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. या महामुकाबल्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला आधी कमी धावांत रोखून नंतर निर्धारीत लक्ष्य सहज पार केलं तसाच डाव आजही त्यांनी आखला आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजी अत्यंत तगडी असल्याने सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे.

विशेष म्हणजे दोन्ही संघानी एकही बदल न करता सेमीफायनलमध्ये खेळवलेलाच संघ आजही मैदानात उतरवला आहे. कारण दोन्ही संघानी मागील काही सामने तसंच सेमीफायनलमध्येही कमालीचा खेळ दाखवला. पाकिस्तान संघाची गोलंदाजी तर सध्या जगात अव्वल दर्जाची असल्याने त्यांनी त्याचा पुरेपुर फायदा घेतला आहे. तर सलामीची जोडी बाबर आणि रिझवान यांनीही सेमीफायनलमध्ये कमाल दाखवल्याने त्यांचा फॉर्म परतल्याचं दिसून येत आहे. इंग्लंड संघाची सलामीची जोडीही अप्रतिम आहे, म्हणूनच त्यांनी भारताला 10 विकेट्सनी सेमीफायनलमध्ये मात दिली. ज्यामुळे दोन्ही संघानी आज एकही बदल केलेला नाही तर नेमका संघ कसा आहे पाहूया...

कस आहे पाकिस्तानचा संघ?

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शादाब खान, शान मसूद, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

कसा आहे इंग्लंडचा संघ?

जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, ख्रिस जॉर्डन. 

हेड टू हेड रेकॉर्ड

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत तब्बल 28 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडचं पारडं कमालीचं जड दिसून आलं आहे. कारण त्यांनी एकूण 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 9 सामन्यात पाकिस्तानचा संघ जिंकला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णीत सुटला आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget