PAK vs RSA, Match Highlights : पावसाच्या व्यत्ययानंतर ओव्हर्ससह टार्गेटही बदललं, अखेर पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 33 धावांनी विजय
PAK vs RSA T20 Score Live: ग्रुप 2 मधील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 36 वा सामना सिडनी येथे खेळवला जात आहे.
LIVE
Background
T20 World Cup 2022 Match Live Streaming : PAK vs RSA T20 Score Live: टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) हे दोन संघ आमने सामने असणार आहे. यंदाच्या विश्वचषकातील हा 36 ला सामना असून ग्रुप 2 मधील सेमीफायनलच्या गणितांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे आजचा सामना पाकिस्तानने गमावल्यास त्यांच स्पर्धेतील आव्हान संपेल तर दक्षिण आफ्रिका थेट सेमीफायनलमध्ये जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताची सेमीफायनलमध्ये जागाही फिक्स होईल. त्यामुळं ग्रुप 2 साठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील सामना आज अर्थात 3 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
कशी आहे ग्रुप 2 ची गुणतालिका?
भारत हा देखील याच ग्रुप 2 मध्ये असून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारतानं चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ ज्यानं या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. त्यानंतर बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर, झिम्बाब्वे चौथ्या क्रमांकावर, पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आणि नेदरलँड्सचा संघ सहाव्या आणि गुणतालिकेच्या तळाशी आहे.
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | भारत | 4 | 3 | 1 | 0 | 6 | +0.730 |
2 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 0 | 1 | 5 | +2.772 |
3 | बांगलादेश | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -1.276 |
4 | झिम्बाब्वे | 4 | 1 | 2 | 1 | 2 | -0.313 |
5 | पाकिस्तान | 3 | 1 | 2 | 0 | 2 | +0.765 |
6 | नेदरलँड्स | 4 | 1 | 3 | 0 | 2 | -1.233 |
हे देखील वाचा-