(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NED T20, Top 10 Points : रोहित, विराटसह सूर्याचं अर्धशतक, भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी विजय, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs NED : पहिल्या सामन्यात पाकिस्तानला मात दिल्यानंतर आता नेदरलँडवर विजय मिळवत भारतानं गुणतालिकेतही पहिलं स्थान मिळवलं आहे.
IND vs NED, T20 World Cup 2022 : भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. आधी पाकिस्तानला मात दिल्यानंतर आता नेदरलँडवर भारतानं दमदार असा विजय मिळवला आहे. सामन्यात आधी नाणेफेक जिंकून भारतान फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत 123 धावांमध्ये नेदरलँडलाला रोखलं. ज्यामुळे सामना भारतानं 56 धावांनी जिंकला, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs NED 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आज देखील नाणेफेक जिंकत भारतानं सामनाही जिंकला आहे.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- ज्यानंतर भारतानं फलंदाजीला येत 180 धावाचं लक्ष्य नेदरलँडसमोर ठेवलं.
- यावेळी भारताच्या तीन फलंदाजांनी अर्धशतक ठोकली. यामध्ये रोहित (53), सूर्यकुमार (51) आणि विराट (62) या तिघांचा समावेश होतो.
- त्यानंतर 180 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या नेदरलँडची सुरुवातच खास झाली नाही.
- भारतीय गोलंदाजांनी नेदरलँडच्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, तसंच विकेट घेणंही कायम ठेवलं.
- 20 षटकात 123 धावांवर नेदरलँडला भारतानं रोखलं. ज्यामुळे भारत 56 धावांनी सामना जिंकला.
- यावेळी भारताकडून आर आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमार या चारही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
- विशेष म्हणजे या विजयासह भारताच्या नावावर 4 गुण झाले असून नेट रनरेटही भारताचा +1.425 झाला आहे. म्हणून ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी आहे
- 25 चेंडूत नाबाग 62 धावा ठोकणाऱ्या मुंबईकर सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून सन्मानित केलं.
सूर्याचा नवा विक्रम
नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात त्यानं अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. या कामगिरीसह सूर्युकमार यादवच्या नावाव नव्या विक्रमांची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटनं सर्वाधिक अर्धशतक झळकावणार सूर्यकुमार यादव पहिला फलंदाज ठरलाय
हे देखील वाचा-