IND vs ENG, Match Highlights: टीम इंडियाचं लाजिरवाण्या पराभवासह विश्वचषकातील आव्हान संपुष्टात, इंग्लंडचा 10 गडी राखून विजय
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सामन्यात इंग्लंडनं स्फोटक फलंदाजी करत तब्बल 10 गडी राखून विजय मिळवला आहे. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपलं असून इंग्लंड फायनलमध्ये पोहोचली आहे.
IND vs ENG Semi Final T20 WC : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतीय संघाचं आव्हान अखेर संपलं आहे. इंग्लंडनं भारताला 10 गडी राखून मात दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि पांड्याच्या जोडीच्या मदतीनं 168 धावा भारतानं स्कोरबोर्डवर लावल्या. पण इंग्लंडनं फलंदाजीला येत सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत 16 षटकांत 170 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि तब्बल 10 गडी राखून विजय मिळवला.
अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताला आधी नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर मात्र इंग्लंडने नाणेफेक जिंकल्याचा फायदा घेत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. सलामीवीर केएल राहुल अगदी स्वस्तात 5 धावा करुन तंबूत परतला. तर रोहितने मात्र 27 धावांची खेळी केली, पण तो देखील मोठी खेळी करु शकला नाही आणि भारताला दुसरा झटका बसला. ज्यानंतर कोहली आणि सूर्या आजही दम दाखवतील असं वाटत असताना सूर्यकुमार 14 धावांवर बाद झाला. पण कोहली मात्र एकहाती झुंज देतच होता. पांड्याने त्याला संथगतीने साथ दिली. मग कोहली 50 धावा करुन बाद होताच पांड्याने गिअर अप करत फटेकबाजी सुरु केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा ठोकल्या पण शेवटच्या चेंडूवर तो चूकीने हिटविकेट झाला ज्यामुळे भारतीय डावाचा अखेरचा चेंडू निर्धाव राहिला. ज्यामुळे भारताने 168 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 169 धावांची गरज होती.
बटलर-हेल्स जोडी भारतावर तुटून पडली
169 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा तर हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या 17 षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला. भारताच्या एकाही गोलंदाजांला चांगली गोलंदाजी करता आली नाही. सर्वच बोलर्सना इंग्लंडच्या बटलर-हेल्स जोडीनं धुतलं. सामनावीर म्हणून इंग्लंडचा सलामवीरी अॅलेक्स हेल्सला सन्मानित करण्यात आलं.
हे देखील वाचा-