एक्स्प्लोर

ICC ODI World Cup 2023 : काऊंटडाऊन सुरू! विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर होणार

WC 2023 Venues & Schedule : यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. या विश्वचषकाला अवघे 100 दिवस शिल्लक आहेत.

ICC Mens Cricket World Cup 2023 : यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. या विश्वचषकाला अवघे 100 दिवस शिल्लक आहेत. आजपासून काऊंटडाऊन सुरु झाले आहे. पाकिस्तानने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला होता. पण आज मुंबईमध्ये वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 

पाकिस्तानने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला होता. ठिकाण आणि सराव सामन्यावरुन बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाट्य सुरु होते. पाकिस्तान आणि भारत या दोन देशात असलेल्या वादाचा परिणाम वेळापत्रकावर झाला होता. भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही, त्यामुळे पाकिस्ताननेही भारतात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पण  आता पाकिस्तानच्या या नाट्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. 

भारतात विश्वचषक खेळायला जायचे की नाही, याबाबत आमच्या सरकारकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आयसीसीला वेळापत्रकाबाबत अद्याप सहमती दर्शवलेली नाही. आमच्या सरकारने भारतात जायची परवानगी दिल्यानंतरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे पीसीबीचे माजी चेअरमन नजीम सेठी म्हणाले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील हाय होल्टेज सामना आयोजित करण्यात आला आहे, यावरच पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. अहमदाबादमध्ये पाकिस्तानला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. अहमदाबाद येथे होणारा सामना चेन्नईला होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोर आणि अफगाणिस्तानविरोधात चेन्नईमध्ये खेळण्यासही पाकिस्तान तयार नाही. बीसीसीआयने या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही आणि पाकिस्तानची विनंती फेटाळली.दरम्यान, बेंगलोरचं मैदान लहान आहे तर चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोशख आहे, त्यामुळेच कदाचीत पाकिस्तानने येथे खेळण्यास नकार दिलाय, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. 

बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसी आणि सहभागी होणाऱ्या देशांना पाठवालाय. त्यानुसार, 2029 चा विश्वविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना चेपॉकवर होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे नऊ सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर आयोजित करण्यात आलाय. विश्वचषकाला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होत आहे... स्पर्धा सुरु होण्यास चार महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे, आज 27 जून रोजी मुंबईतील कार्यक्रमात वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. 

 12 मैदानावर विश्वचषकाचा थरार -

भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. सेमी फायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget