एक्स्प्लोर

World Cup 2019 । सेमीफायनलच्या आधी ऑस्ट्रेलियाला झटका, दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

दरम्यान या दोन खेळाडूंच्या जागी मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, ख्वाजा विश्वचषकातून बाहेर झाला आहे, त्याच्या जागी टीममध्ये मॅथ्यू वेडला समाविष्ट करण्यात आले आहे.

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरीच्या बळावर सेमीफायनलमध्ये धडक मारलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा चांगलाच फटका बसला आहे. सेमीफायनलच्या आधी फार्मात असलेले दोन खेळाडू संघाबाहेर जात असल्याचे संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा तडाखेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेला आहे तर अष्टपैलू खेळाडू  मार्कस स्टॉयनिस देखील जायबंदीझाला आहे. त्याचे इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणे अनिश्चित मानले जात आहे. दरम्यान या दोन खेळाडूंच्या जागी मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, ख्वाजा विश्वचषकातून बाहेर झाला आहे, त्याच्या जागी टीममध्ये मॅथ्यू वेडला समाविष्ट करण्यात आले आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात उस्मान  ख्वाजा दुखापतग्रस्त झाला होता. तर स्टॉयनिस दुखापतीमुळे आधीच्या दोन सामन्यात खेळू शकलेला नाही. दरम्यान, इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे तर दुसरा उपांत्य सामना 11 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येईल. या सामन्यात यजमान इंग्लंडचा मुकाबला त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सात सामन्यातील विजय (14 गुण) आणि एका रद्द सामन्यामधून मिळालेला 1 गुण मिळून 15 गुणांसह भारताने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. तर 5 विजयांसह न्यूझीलंडच्या संघाने 11 गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. दरम्यान नऊ सामन्यांपैकी सात विजयांसह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या संघाने सहा विजयांसह 12 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
Sourav Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget