एक्स्प्लोर

कर्णधार विराट कोहलीच्या मते कशामुळे झाला भारताचा पराभव?

'सामन्याचा पूर्वार्ध आमच्यासाठी चांगला होता. आम्ही खूप चांगले खेळलो. आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. पाठलाग करता येईल, अशा धावसंख्येवर आम्ही न्यूझीलंडला रोखलं. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, त्यामुळे सामन्यावर फरक पडला' असं कोहली पराभवानंतर म्हणाला.

मुंबई : रवींद्र जाडेजाच्या ऐतिहासिक आणि धोनीच्या साहसी खेळीनंतरही भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टीम इंडियाचं विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इर्षेने भारतीय संघ मैदानात उतरला. मात्र पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विजयाचं श्रेय दिलं आहे. 'सामन्याचा पूर्वार्ध आमच्यासाठी चांगला होता. आम्ही खूप चांगले खेळलो. आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. पाठलाग करता येईल, अशा धावसंख्येवर आम्ही न्यूझीलंडला रोखलं. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, त्यामुळे सामन्यावर फरक पडला' असं कोहली पराभवानंतर म्हणाला. कोहलीने रवींद्र जाडेजाचं तोंडभरुन कौतुक केलं. 'जाडेजाने दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी बजावली. त्याची खेळी संघासाठी सकारात्मक ठरली. एक गोष्ट मान्य करणं कितीही कठीण असलं, तरी न्यूझीलंडचा संघ विजय डिझर्व्ह करतो. त्यांनी आम्हाला सतत दबावाखाली ठेवलं' असं कोहली म्हणाला. फलंदाजांचं शॉट सिलेक्शन वाईट होतं. त्यामुळे पराभव चाखावा लागला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र नॉकआऊटमध्ये न्यूझीलंड संघ साहसाने क्रिकेट खेळला, असं मत कोहलीने व्यक्त केलं. सामन्यानंतर कोहलीने चाहत्यांचेही आभार मानले.

Ind vs NZ | न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा, टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम

विश्वचषकाच्या पहिल्या उपान्त्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत मजल मारली. रोहित शर्मा, के एल राहुल या सलामीवीरांसोबतच कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताच्या फायनलचं तिकीट मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या होत्या. पहिल्या दहा षटकांमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावे जमा झाला आहे. सुरुवातीच्या 10 षटकांमध्ये 27 धावा करण्याचा न्यूझीलंडचा विक्रम टीम इंडियाने मागे टाकला. भारताने पहिला पॉवरप्ले समाप्त होईपर्यंत चार गडी गमावून 24 धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये काल (बुधवारी) उपान्त्य सामन्याला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे काल न्यूझीलंड 46.1 षटकांत पाच बाद 211 धावांवर खेळत असताना सामना थांबवण्यात आला. उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला, तेव्हा न्यूझीलंडने आणखी तीन विकेट गमावत 50 षटकात 239 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगलीच अडखळत झाली. हेन्री आणि बोल्ट यांनी भारताच्या सलामीवीरांची जोडी फोडल्यामुळे संघाची चांगलीच दाणादाण उडाली. राहुल, रोहित आणि विराट हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतल्यामुळे तीन षटकांनंतर भारताची अवस्था तीन बाद पाच अशी केविलवाणी झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीचे तिन्ही फलंदाज अवघी एक धाव करुन पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सहा धाव करुन दिनेश कार्तिकही माघारी गेल्यामुळे दहा षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती चार बाद 24 अशी झाली होती. रवींद्र जाडेजाने 77 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या होत्या. मात्र मार्टिन गप्टिलने धोनीला रनआऊट करत भारताच्या उरल्यासुरल्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडवल्या. न्यूझीलंडने विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे, तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीत नऊपैकी सात सामने जिंकत, 15 गुण मिळवून अव्वल ठरत भारताने उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली होती. मात्र उपान्त्य फेरीतच विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ भारतावर आली.

महत्त्वाच्या बातम्या

National Sports Awards : मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
IND vs SL 1st Test DAY-4 Live : दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Rishabh Pant 100 sixes in Tests : अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget