एक्स्प्लोर
Advertisement
World Cup 2019 | SLvsAFG : प्रदीप-मलिंगाचा भेदक मारा, श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर 34 धावांनी विजय
अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 201 धावांत गुंडाळला होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ ल्युईसनुसार अफगाणिस्तानसमोर 41 षटकांत 187 धावांचं नवं लक्ष्य देण्यात आलं होतं.
मुंबई : नुवान प्रदीप आणि लसिथ मलिंगा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने यंदाच्या विश्वचषकात आपलं खातं उघडलं. श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 34 धावांनी विजय मिळवला.
अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 201 धावांत गुंडाळला होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ ल्युईसनुसार अफगाणिस्तानसमोर 41 षटकांत 187 धावांचं नवं लक्ष्य देण्यात आलं होतं. मात्र अफगाणिस्तान संघ केवळ 152 धावांवर ऑल आऊट झाला.
सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून दहा विकेट्सनी पराभव स्वीकारल्यानंतर या सामन्यात श्रीलंकेने एक बाद 144 अशी दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर मोहम्मद नबीच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला.
नबीने अवघ्या तीस धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर रशिद खान, दौलत झादरानने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून कुशल परेराने आठ चौकारांसह 78 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. 36.5 षटकांतच 201 धावांवर श्रीलंकेचा गाशा गुंडाळण्यात अफगाणिस्तानला यश आलं होतं.
श्रीलंका 33 व्या षटकात 8 बाद 182 धावांवर असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे डकवर्थ ल्युईस नियमानुसार अफगाणिस्तानसमोर 41 षटकांत 187 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र 32.4 षटकांतच अफगाणिस्तान संघ सर्व गडी गमावून 152 धावांवर थबकला.
श्रीलंकेकडून नुवान प्रदीपने चार विकेट्स घेतल्या, तर लसिथ मलिंगाने तीन आणि इसुरु उदाना तसेच थिसारा परेरा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला, तर एक फलंदाज रनआऊट झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement