एक्स्प्लोर

19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम हिने आपल्या सीनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदार्पणात पदकावर नाव कोरलेय.  ५३ किलो वजनी गटामध्ये अंतिम पंघाल हिने कांस्य पदकावर नाव कोरत 140 कोटी भारतीयांची मने जिंकली. अंतिम पंघालने यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे. अंतिम पंघाल ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी पहिली कुस्तीपटू ठरली. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 53 किलो वजनी गटात पंघलने युरोपच्या जोआना माल्मग्रेन हिचा पराभव केला. 19 वर्षीय पंघाल जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सहावी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. अंतिम पंघालआधी २०१२ मध्ये गीता फोगट, २०१२ मध्ये बबिता फोगट, २०१८ मध्ये पूजा धांडा, २०१९ मध्ये विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी जागतिक स्पर्धेत भारतासाठी पदके जिंकली आहेत.

सर्बिया येथील बेलग्रेडमध्ये आयोजित जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप (World Wrestlers Championship) स्पर्धेत अंतिम पंघाल हिने जोआना माल्मग्रेन हिला 16-6 अशा गुणांनी मात दिली.  गतवर्षी माल्मग्रेन हिने 23 वर्षांखालील युरोपीय चॅम्पियनशिप आणि वरिष्ठ युरोपीय चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते.  गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत माल्मग्रेनला कांस्य पदकाच्या सामन्यात भारताच्या विनेश फोगाट हिने पराभूत केले होते.

अंतिम हिने विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी 23 वे पदक जिंकलेय. भारताने स्पर्धेत आतापर्यंत 23 पदके जिंकली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण आणि १७ कांस्य पदकाचा समावेश आहे.

१९ वर्षीय अंतिमला उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कलादजिंस्काया हिच्याकडून अंतिमला पराभूत व्हावे लागले. अटीतटीच्या लढतीत अंतिमला 4-5 ने पराभव स्विकारावा लागला. कलादजिंस्काया हिनेच टोकिया ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटलाही पराभूत केले होते. अंतिम पंघाल हिने उप-फेउपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या रोक्साना मार्ता जसीना हिला 10-0ने पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत रूसच्या नतालिया मालिशेवा हिला 9-6ने नमवले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget