(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra : नीरज चोप्रा इतिहास रचण्यासाठी सज्ज, वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल फेरी, कधी, कुठे पाहाल, वाचा सविस्तर
World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली असून आता तो फायनलमध्येही भारताचं नाव मोठं करण्यासाठी सज्ज झाली आहे.
World Athletics Championships 2022: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर जगभरात भारताचं आणि नीरजचं नाव झालं. आता नीरज आणखी एक मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. नीरज चोप्रानं अमेरिकेतल्या जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेतही (World Athletics Championships 2022) कमाल कामगिरी करत अंतिम फेरी गाठली असून आता फायनलमध्ये जिंकून पदकाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे आहे. नीरजनं प्राथमिक फेरीतल्या पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतराची नोंद केली. याच कामगिरीनं त्याला फायनलचं तिकीट मिळवून दिलं.
भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आलेलं नाही. 2003 सालच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास आहे. या स्पर्धेत नीरज चोप्राला ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सकडून कडवे आव्हान मिळेल, असे मानले जात आहे. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स हा सध्याचा जगज्जेता आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्टॉकहोममध्ये नीरज चोप्राला पराभूत करून सुवर्णपदक जिंकताना त्याने यावर्षी तीनदा 90 चा टप्पा ओलांडला आहे.
कधी, कुठे पाहाल सामना?
नीरज चोप्राचा भालाफेक स्पर्धेची ही अंतिम फेरी उद्या अर्थात रविवारी 24 जुलै रोजी होणार आहे. ही अंतिम फेरी रविवारी सकाळी सात वाजता सुरु होईल. भारतीय दर्शक नीरज चोप्राचा सामना सोनी टेन 2 (Sony TEN 2) आणि सोनी टेन 2 एचडी (Sony TEN 2 HD) टीव्हीवर पाहू शकतात. याशिवाय सोनी लिव्ह (SonyLIV) वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा