एक्स्प्लोर

12 वर्षांनी भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये

कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली. एप्रिल 2005 नंतर म्हणजे तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

डर्बी : कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करून, इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. या उपांत्य सामन्यात नाबाद 171 धावांची खेळी करणारी हरमनप्रीत कौर भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली. हरमनप्रीतच्या खेळीच्याच जोरावर भारताने 42 षटकांत 4 बाद 281 धावांची मजल मारली होती. एलिस विलानी, एलिस पेरी आणि अॅलेक्स ब्लॅकवेल यांच्या झुंजार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 245 धावांची मजल मारता आली. मात्र भारताने दिलेलं आव्हान पेलता आलं नाही. भारताच्या फलंदाजीनंतर गोलदाजांनीही साजेशी खेळी केली. दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय महिला गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची एकही फलंदाजी टिकू शकली नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 245 धावांवर आटोपला. हरमनप्रीतचा झंझावात हरमनप्रीत कौरच्या नाबाद 171 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात हरमनप्रीतने 115 चेंडूंत नाबाद 171 धावांची खेळी उभारून कमाल केली. तिचं वन डे कारकीर्दीतलं हे तिसरं शतक ठरलं. तिच्या शतकाला वीस चौकार आणि सात षटकारांचा साज होता. हरमीनप्रीत 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 171 धावा ठोकल्या. तर व्ही कृष्णमूर्तीही 10 चेंडूत 16 धावा करुन नाबाद राहिली. डर्बीतल्या या सामन्यात सलामीच्या स्मृती मानधना आणि पूनम राऊत स्वस्तात माघारी परतल्या. पण हरमनप्रीतनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं 66 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. मग तिनेच दीप्ती शर्माच्या साथीनं 137 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला मजबुती दिली

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget