(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India : इंग्लंडमध्ये क्वारंटाईन काळात टीम इंडियाला प्रॅक्टिसला परवानगी? मोठी माहिती समोर
Team India Update : टीम इंडिया 18 ते 22 जूनपर्यंत न्यूझीलंड विरोधात टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. तसेच टीम इंडिया चार ऑगस्टपासून 14 सप्टेंबरपर्यंत इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.
Team India Update : टीम इंडिया 18 ते 22 जूनपर्यंत न्यूझीलंड विरोधात टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. तसेच टीम इंडिया चार ऑगस्टपासून 14 सप्टेंबरपर्यंत इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्व टेस्ट करंडक (WTC)फायनलच्या आधी क्वारंटाईन दरम्यान बायोबबल काळात साउदाम्प्टनमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याआधी तीन दिवसांच्या हार्ड क्वारंटाईनमधून जावं लागण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ 2 जून रोजी मुंबईवरुन इंग्लंडला रवाना होणार आहे. तिथं पोहोचल्यानंतर 10 दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र संघांना सराव करता यावा यासाठी बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) सोबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
परिवाराला सोबत घेऊन जाण्याची परवानगी
टीमचा ब्रिटन दौरा जवळपास तीन महिन्यांचा असेल. शेवटची टेस्ट मॅच 14 सप्टेंबरला संपेल. न्यूझीलॅंडविरुद्ध विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत देखील एका महिन्याचं अंतर आहे. त्यामुळं टीमच्या खेळाडूंना परिवाराला सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.
केएल राहुल आणि साहा (विकेटकीपर) यांना फिटनेस क्लियरंस पास करावं लागेल
स्टँडबाय खेळाडू: अभिमन्यु ईस्वरवान, प्रसिध्द कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला
18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल
18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. भारतीय टीम न्यूझीलंडविरोधात हा सामना खेळेल. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरोधात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वात आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.