एक्स्प्लोर
आर अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला!
चेन्नई : जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि नुकताच क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकणारा रवीचंद्रन अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. आर अश्विनची पत्नी प्रिती नारायणने तिच्या सोशल मीडिया पेजवर याबाबतची माहिती दिली.
अश्विनचं हे दुसरं बाळ आहे. याआधी 2015 मध्ये तो पहिल्यांदा बाबा बनला होता. त्याला अकिरा नावाची मुलगी आहे.
अश्विन आणि प्रितीच्या घरी 21 डिसेंबर रोजी छोट्या पाहुणीचं आगमन झालं. मात्र तिने पाच दिवसांनंतर ही गोड बातमी शेअर केली.
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याची बातमी झाकोळली जाऊ नये, अशी प्रितीची इच्छा होती, त्यामुळे तिने जाणीवपूर्वक ही गोड बातमी आधी सांगितली नाही.
प्रिती म्हणाली की, मी 21 डिसेंबर रोजी बाळाचा जन्म झाला. पण वरदा वादळामुळे राज्यातील व्यवहार ठप्प होते आणि चेपॉकमध्ये कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाचा जन्म झाला. आम्हा अप्पाच्या (अश्विन) क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याचा क्षण हिरवायचा नव्हता. त्यामुळे मी आता ही गोड बातमी सांगत आहे. आम्हाला मुलगी झाली.
2016 हे वर्ष अश्विनसाठी कमाल ठरलं. या वर्षी त्याची कामगिरी शानदार होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने सर्वाधित विकेट्स घेतल्या. त्यामुळेच त्याची टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर आणि क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली. हा सन्मान मिळवणारा आर अश्विन तिसरा भारतीय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement