एक्स्प्लोर
पाकमध्ये जाऊन विजयोत्सव करा, फुटीरतावाद्यावर गंभीर बरसला
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर दोन्ही देशातून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. काश्मिरचा फुटीरतावादी नेता आणि भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यातही सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगलं.
काश्मिरातील फुटीरतावादी नेते मिरवाईझ उमर फारुक यांच्या ट्वीटनंतर वादाला सुरुवात झाली. 'सगळीकडे फटाके फुटत आहेत. ईद लवकर आली, असं वाटत आहे. चांगली टीम आज जिंकली. पाकिस्तानी संघाचं अभिनंदन' असं ट्वीट फारुक यांनी केलं.
https://twitter.com/MirwaizKashmir/status/876471074229071872
फारुक यांच्या ट्वीटमुळे भारताची माजी सलामीवीर गौतम गंभीरचं पित्त चांगलंच खवळलं. 'मिरवाईझ, तुम्हाला एक सल्ला आहे. तुम्ही सीमा का नाही पार करत. तुम्हाला चांगले फटाके मिळतील (चिनी?) ईद तिकडे साजरी करा. मी तुम्हाला बॅगा भरायला मदत करतो.' असं ट्वीट गंभीरने केलं.
https://twitter.com/GautamGambhir/status/876500044823773184
कालचं ट्वीट ही फारुक यांची पहिली वेळ नव्हती. इंग्लंडला हरवून पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल झालं, त्यावेळीही त्यांनी फटाक्याचे आवाज ऐकू येत असल्याचं ट्वीट करत पाक संघाला शुभेच्छा दिल्या होत्या.
https://twitter.com/MirwaizKashmir/status/875040391581618176
गौतम गंभीर कायमच भारतीय सैन्याविषयी, देशभक्तीची भावना जागवणारे विचार ट्विटरवर मांडत आला आहे. फारुक यांना हटकल्यानंतर सोशल मीडियावर गंभीरवर कौतुकाचा वर्षाव झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement