एक्स्प्लोर
...तर विराटसोबत खेळण्याची चाहत्यांना संधी
तुम्ही मित्रांसोबत एखादा स्पोर्ट खेळा, कोणताही खेळ. त्याचं व्हिडिओ फूटेज #One8Crew या हॅशटॅगसह शेअर करा.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचसोबत व्हिडिओ ट्वीट करत तरुणांना एक आवाहन केलं आहे. यानुसार विराटच्या चाहत्यांना त्याच्यासोबत एखादा क्रीडाप्रकार खेळण्याची संधी मिळणार आहे.
'तुम्ही मित्रांसोबत एखादा स्पोर्ट खेळा, कोणताही खेळ. त्याचं व्हिडिओ फूटेज #One8Crew या हॅशटॅगसह शेअर करा. मी तुम्ही पाठवलेले व्हिडिओ पाहीन. तुमच्यापैकी काही जणांना माझ्यासोबत खेळण्याची संधी मिळेल.' असं विराटने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
बर्थडे स्पेशल : भारतीय क्रिकेटचा बिग ‘व्ही’
https://twitter.com/imVkohli/status/927199785051832320विराट @29 : ड्रेसिंग रुममध्ये विराटच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 29 वा वाढदिवस आहे. रात्री 12 वाजता ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तो सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर या यादीत विराटचा नंबर लागतो. शिवाय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 9 हजार धावा ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.बर्थ डे स्पेशल : गेल्या एका वर्षात कोहलीची 'विराट' कामगिरी
विराट कोहली हा क्रिकेटमधील प्रत्येक विक्रमाला गवसणी घालणारा फलंदाज आहे. सर्वाधिक शतकं, सर्वाधिक वेगवान धावा, स्पोर्ट्स ब्रँड, यशस्वी कर्णधार आणि कमी वयात एवढी उंची गाठणारा ता जगातील एकमेव फलंदाज असावा.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement