एक्स्प्लोर
विराटला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून चाहता मैदानात!
छायाचित्रकार बसलेल्या मीडिया गॅलरीतून एक चाहता विराटच्या नावाची जर्सी आणि तिरंगा घेऊन मैदानात उतरला.
कानपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला भेटण्यासाठी त्याचा एक चाहता सुरक्षा भेदून मैदानात उतरला. विराटचं शतक पूर्ण होताच हा चाहता त्याच्याकडे धावत आला. मात्र विराटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं.
कानपूर वन डेत विराटने शतक पूर्ण करताच या चाहत्याने मैदानात धाव घेतली. छायाचित्रकार बसलेल्या मीडिया गॅलरीतून एक चाहता विराटच्या नावाची जर्सी आणि तिरंगा घेऊन मैदानात उतरला. या घटनेनंतर काही काळासाठी खेळही थांबवण्यात आला होता.
दरम्यान या प्रसंगानंतर पुढच्याच चेंडूला हार्दिक पंड्या बाद झाला. विराट कोहलीने 106 चेंडूंमधली 113 धावांची खेळी नऊ चौकार आणि एका षटकारानं सजवली. विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 32 वं शतक ठरलं. त्याने वन डे सामन्यांमधल्या नऊ हजार धावांचा टप्पाही आज ओलांडला.
टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर सहा धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला हा सलग सातवा मालिकाविजय ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement