एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियन संघ नव्हे, काही खेळाडूंशी मैत्री नाही : कोहली
मुंबई: 'ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आता माझे मित्र होऊ शकत नाहीत', या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली. मात्र आता स्वत: विराट कोहलीने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
"मी संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला नव्हे तर काही खेळाडूंबाबत बोललो होतो. तसंच ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी माझी मैत्री आहे, ती कायम असेल. शिवाय आयपीएलमध्ये माझ्यासोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या खेळाडूंसोबतच्या संबंधातही काही बदल होणार नाहीत", असं कोहली म्हणाला.
कोहलीने ट्विट करुन आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
https://twitter.com/imVkohli/status/847294937041313792
https://twitter.com/imVkohli/status/847295042226077697
कोहली काय म्हणाला होता?
गावसकर-बॉर्डर मालिका भारताने 2-1 ने जिंकल्यानंतर कोहलीला विचारलं की, स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघ अजूनही तुझे मित्र आहेत का? यावर भारतीय कर्णधाराने अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. तो म्हणाला की, “नाही, आता पहिल्यासारखं नाही. मी आधी असाच विचार करायचो, पण आता सगळं बदललं आहे. खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे म्हटलं होतं, त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो. त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली
याशिवाय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन मीडियाचाही क्लास घेतला. “घरात बसून ब्लॉग लिहिणं किंवा माईकवर बोलणं सोपं असतं. पण मैदानात येऊन सामना करणं अतिशय कठीण असतं,” असं तो म्हणाला.
डीआरएस वादादरम्यान विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन कर्णधाराला ‘खोटारडा’ म्हटलं होतं. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि काही खेळाडूंनी कोहलीला टीकेचं लक्ष्य केलं. ते सातत्याने कोहलीवर निशाणा साधत होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर कोहलीची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली होती.
संबंधित बातम्या
भारतीयांची, विशेषत: कोहलीची माफी मागतो : ब्रॅड हॉज
टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो ! ‘तू बोलत राहा, मी मारत राहतो,’ जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर! DRSमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडलं क्रिकेटच्या इतिहासात… मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement