एक्स्प्लोर
'कोहली दोन्ही वर्ल्ड कप जिंकेल, सचिनचा विक्रम मोडेल'
भारत 2011 मध्ये विश्वचषक जिंकेल, अशी भविष्यवाणी बुंदे यांनी केली होती
नागपूर: क्रिकेटमधील अचूक भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेले ज्योतिषी नरेंद्र बुंदे यांनी विराट कोहलीबाबत भविष्य व्यक्त केलं आहे.
टीम इंडियाचं रनमशीन अर्थात कर्णधार विराट कोहली हा टी ट्वेण्टी आणि वन डे असे दोन्ही विश्वचषक जिंकेल, अशी भविष्यवाणी नरेंद्र बुंदे यांनी केली आहे.
इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानातला विक्रमवीर विराट कोहली जाहिरातींच्या दुनियेतही एक मोठा विक्रम रचेल. कोहली जाहिरात क्षेत्रात असा करार करेल, जे पाहून भारतीय क्रीडाजगत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट अवाक् होईल, असं भविष्यही बुंदे यांनी वर्तवलं आहे.
कोहली 2025 पर्यंत भारताला वन डे आणि टी ट्वेण्टी विश्वचषक जिंकून देईल, असं बुंदे यांनी भविष्य सांगितलं. तसंच या ज्योतिषानं महेंद्रसिंग धोनी 2019 सालचा विश्वचषक खेळणार असल्याची भविष्यवाणीही केली.
याशिवाय कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रमही मोडेल अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे.
बुंदे म्हणाले, “आतापर्यंत माझी भविष्यवाणी अचूक ठरली आहे. विराट 2025 पर्यंत टी 20 आणि वन डे विश्वचषक जिंकेलच, शिवाय सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांचा विक्रमही मोडेल”
बुंदे यांनी यापूर्वी अनेकवेळा क्रिकेटबाबत भविष्य वर्तवलं होतं. सचिन दुखापतीतून पुनरागमन करेल, त्याला भारतरत्न मिळेल, गांगुली पुनरागमन करेल, भारत 2011 मध्ये विश्वचषक जिंकेल, अशी भविष्यवाणी बुंदे यांनी केली होती, ती खरी ठरली होती.
बुंदेंकडून अनेक क्रिकेटपटूंनी सल्लाही घेतला आहे. यामध्ये सौरव गांगुली, मुरली कार्तिक, एस श्रीसंत, झहीर खान, गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
महिन्याला 15 लाख भाडं, विराट-अनुष्काचं वरळीतील घर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement