(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli Mobile Wallpaper : ना पत्नी अनुष्का ना मुलगी वामिका, किंग कोहलीच्या मोबाईल वॉलपेपरवर नेमका कोणाचा फोटो?
भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मोबाईल फोनच्या वॉलपेपरची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. विराट कोहली सध्या लंडनला पोहोचला आहे.
मुंबई : टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) जिंकणारी टीम इंडिया अखेर भारतात पोहोचली आहे. मुंबईत येताच भारतीय क्रिकेट संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. लाखो क्रिकेटप्रेमी भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यावर जमले होते. विशेष म्हणजे या संघाची एक विजयी रॅली काढण्यात आली. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करणारा विराट कोहली (Virat Kohli) या रॅलीच्या केंद्रस्थानी होती. दरम्यान, आता विराट कोहली लंडनला गेला आहे. लंडनला जाताना तो एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या मोबाईलवरील वॉलपेपर सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
विराट कोहली मुंबईहून थेट लंडनला
मुंबईतील वानखेडे मैदानावर टीम इंडियाच्या स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान विराटचा उत्साह दिसून आला. त्याने आपल्या लाखो चाहत्यांसमोर विराटने भाषण केले. त्याआधी त्याने रॅलीदरम्यान लोकांचे अभिनंदन स्वीकारले. स्टेडियमवरही त्याने चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. हा संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर विराट कोहली मुंबईत राहून आराम करेल, अशी अपेक्षा होती. पण कार्यक्रम संपल्यानंतर तो थेट लंडनला गेला. विरटची पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका, मुलगा अकाय हे सध्या लंडनमध्येच आहेत.
16 hours flight from Barbados to Delhi, went to team's hotel, met PM, departed for Mumbai, joined the team bus parade, reached Wankhede, had a speech, danced, had a victory lap and then departed for London.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 5, 2024
- Virat Kohli's schedule in a single day! 🫡pic.twitter.com/m0PPAxiK0I
विराटच्या वॉलपेपरवर नीम करोली बाबा? (Neem Karoli Baba On Virat Kohli Phone Wallpaper)
विराट कोहली लंडनकडे रवाना होताना मुंबईच्या विमातनळावर तो दिसला. यावेळी पापाराझींनी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी त्याचे व्हिडीओही काढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी विराट कोहलीचा मोबाईल वॉलपेपरही कैद झाला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये विराटच्या हातातील मोबाईलचा वॉलपेपर दिसतोय. हा फोटो बघून विराटच्या मोबाईल वॉलपेपरवर नीम करोली बाबा असल्याचा दावा केला जातोय. तशा प्रतिक्रियाही विराटच्या चाहत्याने केल्या आहेत.
Virat Kohli having wallpaper of Neem Karoli Baba on his phone. 🙌❤️ pic.twitter.com/M96ag5xH3L
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 5, 2024
नीम करौली बाबा कोण आहेत?
नीम करौली बाबा उत्तराखंडमधील प्रसिद्ध बाबा आहेत. त्यांचा कैंची धाम नावाचा मोठा आश्रम आहे. नीम करौली बाबा यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त उत्तराखंडमध्ये जातात. जगप्रसिद्ध सोशल मीडिया माध्यम इन्स्टाग्राम, फेसबूक या कंपन्यांचे मालक मार्क झुकरबर्ग, अॅपल कंपनीचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब आदी अनेक दिग्गज नीम करौली बाबा यांच्या दर्शनसाठी आलेले आहेत. विराट कोहली यानेदेखील 2023 मध्ये आपली पत्नी अनुष्का शर्मासह करौली बाबा यांचे दर्शन घेतले होते.
विराटच्या डोळ्यांतून आनंदाश्रू
दरम्यान, सध्या करण्यात आलेल्या दाव्याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नाही. भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये तो अजूनही खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर विराट कोहली भावूक झाल्याचे दिसले. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळल्याचे दिसून आले.
हेही वाचा :
मुलगा समोर दिसताच जवळ घेतलं, मायेने कुरवाळलं; विश्वविजेत्या रोहितची आई भावुक; 'तो' क्षण व्हायरल!