एक्स्प्लोर
कठीण परिस्थितीत सचिनपेक्षा विराट उत्कृष्ट फलंदाज : इम्रान खान
![कठीण परिस्थितीत सचिनपेक्षा विराट उत्कृष्ट फलंदाज : इम्रान खान Virat Kohli Is Better Than Sachin Tendulkar In Critical Moments Says Imran Khan कठीण परिस्थितीत सचिनपेक्षा विराट उत्कृष्ट फलंदाज : इम्रान खान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15103616/Virat_Sachin-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : "कठीण परिस्थितीत विराट कोहली हा सचिन तेंडुलकरपेक्षा उत्कृष्ट फलंदाज आहे," असं दावा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खानने केला आहे.
एका इंग्लिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाला की, "मी आतापर्यंत जे खेळाडू पाहिले आहेत, त्यामध्ये विराट कोहली हा परिपूर्ण खेळाडू आहे. तो अष्टपैलू आहे."
इम्रानच्या मते, " क्रिकेटचा स्वत:चा एक काळ असतो. 1980 च्या काळात व्हिव्हियन रिचर्ड्स, त्यानंतर ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरचा काळ आला. पण विराट सर्वात परिपूर्ण फलंदाज आहे. विराटच्या दोन्ही पायांच्या हालचालीत ताळमेळ असतो आणि तो मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शॉट खेळू शकतो."
"कठीण परिस्थितीत विराटची कामगिरी उंचावते, मात्र अशा काही स्थितीत सचिन सपशेल अपयशी ठरायचा," असंही इम्रान खान म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)