एक्स्प्लोर

'विराट' विक्रम... कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलंवहिलं द्विशतक!

अँटिगा: अँटिगा कसोटीवर टीम इंडियानं आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. विराटचं द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारतानं पहिला डाव आठ बाद 566 धावांवर घोषित केला. तर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजला एक बाद 31 धावांची मजल मारता आली आहे.   भारतीय क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीनं रचला नवा विक्रम. परदेशात द्विशतक ठोकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिलदेव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या रथीमहारथी कर्णधारांनाही आजवर अशी कामगिरी करता आलेली नाही. पण विराटनं अँटिगा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.   विराटनं 283 चेंडूंत 200 धावांची खेळी 24 चौकारांनी सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच द्विशतक ठरलं.   कोहलीच्या या विराट खेळीनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे कोहलीनं द्विशतक ठोकलं, तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसला.   कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा विराट कोहली हा आजवरचा पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि धोनीनं कर्णधार या नात्यानं कसोटीत द्विशतक झळकावलं होतं. पण ही सर्व द्विशतकं भारतात ठोकली होती. अँटिगात द्विशतक करुन विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बारा हजार धावांचाही टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा आठवा भारतीय खेळाडू ठरला.   गेल्या काही वर्षांत विराटनं भारतात आणि भारताबाहेरही भरीव कामगिरी बजावली आहे. मग ऑस्ट्रेलिया असो किंवा दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड असो वा श्रीलंका देशात आणि परदेशातही विराटनं आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आहे.   अँटिगा कसोटीत विराटनं कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. विराटनं शिखर धवनच्या साथीनं 105, रहाणेच्या साथीनं 57 आणि अश्विनच्या साथीनं 168 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाला कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत करुन दिली.   अँटिगाच्या खेळपट्टीवर विराटसह रवीचंद्रन अश्विननंही धावत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. आणि कसोटी कारकीर्दीतलं आपलं तिसरं शतक साजरं केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
Why BCCI Ban Rohit Yadav : BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
India vs Japan T20 Match : आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?
आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?
Ind vs Pak Women's Asia Cup Live Streaming : भारत-पाकिस्तान सामन्याचा काऊंटडाऊन सुरू! कधी, कुठे अन् LIVE कसा पाहाल? जाणून घ्या A टू Z
भारत-पाकिस्तान सामन्याचा काऊंटडाऊन सुरू! कधी, कुठे अन् LIVE कसा पाहाल? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Embed widget