एक्स्प्लोर
सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा पूर्ण, विराटचा विश्वविक्रम
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम होता. डिव्हीलियर्सने 205 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
कानपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कानपूर वन डेत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक ठोकलं. त्याने 106 चेंडूंमधली 113 धावांची खेळी नऊ चौकार आणि एका षटकाराने सजवली. विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 32 वं शतक ठरलं. त्याने वन डे सामन्यांमधल्या नऊ हजार धावांचा टप्पाही आज ओलांडला.
विराटने 194 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. एवढ्या वेगवान 9 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम होता. डिव्हीलियर्सने 205 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
भारतीय फलंदाजांमध्ये या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली अव्वल स्थानावर होता. गांगुलीने 228 इनिंगमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडलुकरला 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 235 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. या वन डेत 113 धावांची शतकी खेळी करणारा विराट 9 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील 113 वा खेळाडू आहे.
विराट वन डेत 9 हजार पेक्षा जास्त धावा करणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला. भारताकडून यापूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने गेल्या वर्षी हा टप्पा पूर्ण केला होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी 9 हजारपेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement