एक्स्प्लोर

तीनही कसोटी मालिकेत 600 पेक्षा जास्त धावा, विराट एकमेव भारतीय

तीन कसोटी मालिकांमध्ये 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे.

नवी दिल्ली : या वर्षात नवनवे विक्रम नावावर करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात विराटने 50 धावा केल्या. यासोबतच तीन कसोटी मालिकांमध्ये 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे. विराटने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 610 धावा केल्या. शिवाय त्याने 2016-17 च्या सत्रात इंग्लंडविरुद्ध 655 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 692 धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 5 डावांमध्ये विराटने एकदा नाबाद खेळी करत 610 धावा केल्या. कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने 104 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर कोहलीने नागपूर कसोटीत 213 धावांची खेळी केली. दिल्ली कसोटीत विराटने शानदार 243 धावांची खेळी केली आणि सलग दोन द्विशतक ठोकणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही 50 धावांची खेळी केली. या मालिकेत त्याने 152 च्या सरासरीने धावा काढल्या. शिवाय 82.21 च्या स्ट्राईक रेटने 57 चौकार आणि चार षटकार ठोकले. यापूर्वी कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन वेळा नाबाद खेळी करत 655 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेत 235 ही त्याची सर्वोच्च खेळी होती. कोहलीने 60.87 च्या स्ट्राईक रेटने एकूण 72 चौकार आणि एक षटकार ठोकला होता. राजकोटमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीतल्या पहिल्या डावात 40 आणि दुसऱ्या डावात विराटने नाबाद 49 धावांची खेळी केली. विशाखापट्टणममध्ये त्याने 167 आणि 81 धावा केल्या. मोहालीमध्ये 62 आणि नाबाद 6, मुंबई कसोटीत 235 आणि चेन्नई कसोटीत 15 धावांची खेळी केली. विराटने पहिल्यांदा 600 पेक्षा जास्त धावा 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने आठ डावांमध्ये 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या होत्या. यामध्ये चार शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. या मालिकेतील 692 धावांमध्ये 77 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कोहलीने अॅडिलेड कसोटीतील दोन्हीही डावांमध्ये शतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या डावात 115, तर दुसऱ्या डावात 114 धावा केल्या. मेलबर्न कसोटीत 169 आणि 54, तर सिडनी कसोटीत 147 आणि 46 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget