एक्स्प्लोर

Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगाट राजकारणात उतरणार? शेतकरी आंदोलनात हजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

शंभू बॉर्डरवर २०० दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनात विनेश फोगाटने शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर विनेश राजकारणात प्रवेश करणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Vinesh Phogat: पॅरिस ऑलंपिकच्या फायनलमध्ये गेलेली कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. हरियाणात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूका आहेत. मागच्या २०० दिवसांपासून शंभू बॉर्डरवर हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांची कुस्तीपटू विनेश फोगाटने भेट घेतल्यानं आता विनेश राजकारणात प्रवेश करणार का? तिनं राजकारणात प्रवेश केला तर कोणत्या पक्षात ती प्रवेश करणार? हरियाणाच्या राजकारणात विनेश फोगाटच्या प्रवेशानं काही फरक पडेल का अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्यातील राजकीय वातावरण शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर ढवळून निघाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनात विनेश सहभागी झाल्यानं राजकारणात ती प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विनेश फोगाट करणार का राजकारणात प्रवेश?

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंसोबत विनेशही सहभागी झाली होती. कुस्तीपटूंच्या मुद्दयावरून 2024 च्या लोकसभेत विरोधी पक्षांनी भाजपला घेरले होते. आता आंदोलनातील शेतकऱ्यांची विनेशने भेट घेतल्यानं हरियाणाच्या राजकारणात विनेशची एन्ट्री होणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

शेतकऱ्यांशी काय केली चर्चा?

13 फेब्रुवारीपासून हरीयाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा राजधानीकडे निघाला होता. शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखून धरल्याने मागील 200 दिवसांपासून शेतकऱ्यांचे किमान आधारभूत किमतीसाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, विनेश फोगाटने शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांची मुलगी पाठीशी असल्याचं सांगितलं.  आपल्यालाच आपली लढाई लढावी लागणार असल्याचं सांगत तिनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी सरकारला विनंती केली. यावेळी मीही दिल्लीत आंदोलनाला अनेक दिवस बसले होते. पण आज इथे आल्यावर दिसले की, पहिल्या दिवसासारखाच उत्साह शेतकऱ्यांमध्ये आहे. आता आमच्या कुटुंबालाही लढण्याची युक्ती कळली आहे. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावेच लागते.” असेही ती म्हणाली.

विनेशला राजकीय पार्श्वभूमी

विनेश फोगाट ही कुस्तीपटू असली तरी तिला राजकारण नवे नाही. ती राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आली आहे. विनेशची चुलत बहीण बबीता फोगटने 2019 मध्ये दादरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण यात तिचा पराभव झाला होता. राजकारणात प्रवेश करणार का असे विचारल्यावर तिने मला राजकारणाची फार माहिती नाही. मी खेळाडू आहे. त्याविषयी विचारले तर सांगेन असे उत्तर दिले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NandKumar Gorule on Anand Dighe : लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नकाBhigyan Kundu Under19 Cricket : अभिग्यान कुंडूची भारताच्या अंडर 19 संघात निवडRamdas Kadam : मोहम्मद पैगंबराबद्दल रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह : रामदास कदमKolkata Case : कोलकातामधील हत्याप्रकरणी आरजी कार काॅलेजचे प्राचार्य संदीप घोषला अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
Embed widget