एक्स्प्लोर
'या' महत्वाच्या सामन्यात चक्क थर्ड-अंपायरच नव्हता!
लंडन: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात सध्या डीआरएसचा वापर करण्यात येत आहे. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन योग्य निकाल देण्याकडे आयसीसीचा कल आहे. मात्र, असं असतानाही कालच्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज सामन्यातील एका निकालानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काल (सोमवार) आयसीसी महिला विश्वचषकातील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं वेस्टइंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पण वेस्टइंडिजची फलंदाजी सुरु असताना पंचांनी एक असा निर्णय दिला की, ज्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
14व्या ओव्हरमध्ये वेस्टइंडिज फलंदाज चेडिन नेशन 2 धावांवर फलंदाजी करत होती. तेव्हा तिनं एक चेंडू स्क्वेअर लेगला मारला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिल्डरनं चेंडू थेट विकेटकीपरकडे फेकला. आणि विकेटकीपरनं बेल्स उडवले देखील. पण मैदानावरील पंच कैथी क्रॉसनं रिप्ले न पाहाता फलंदाजाला नाबाद ठरवलं. त्यानंतर चेडिननं 39 धावा केल्या.
कारण की, सामन्यामध्ये मैदानावरील पंचांशिवाय कुणीही तिसरं पंच नव्हतं. यामुळेच पंच कैथी हिने तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामुळे हा निर्णय पुन्हा बदलता आला नाही.
असं यासाठी झालं की, महिला क्रिकेटमधील सर्वच सामने हे टीव्हीवर प्रसारित केले जात नाही. त्यामुळे जे सामने टीव्ही दाखवले जात नाहीत. त्यामध्ये थर्ड अंपायनर न ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला नसल्याची टीका करण्यात येत आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement